श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरनंतर मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवही श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. (suryakumar yadav out of shrilanka series)
वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार खेळ करणारा सूर्यकुमार यादवच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या ३ टी-२० मालिकेत तो दिसणार नाही. पहिला सामना गुरुवारी २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती.
सूर्यकुमार यादवची दुखापत किती गंभीर आहे आणि त्याला मैदानात परतण्यासाठी किती वेळ लागेल हे अद्याप कळू शकलेले नाही. याआधी मंगळवारी दीपक चहरलाही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून वगळण्यात आले होते. दीपक चहरला मैदानात परतण्यासाठी ५ ते ६ आठवडे लागणार आहे.
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध १८ सदस्यीय टी-२० संघाची घोषणा केली होती, आता २ खेळाडूंच्या दुखापतीनंतर संघाकडून बदलीची घोषणा होण्याची फारशी आशा नाही. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत संघात सामील होण्यासाठी कोणत्याही खेळाडूला बायो बबल आणि आयसोलेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, जी इतक्या कमी वेळात अशक्य होईल.
टीम इंडियाला २४ फेब्रुवारीपासून लखनऊमध्ये टी-२० मालिका सुरू करायची आहे, तर दुसरा आणि तिसरा टी-२० सामना २६ आणि २७ फेब्रुवारीला धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार कामगिरी केली होती, पण त्याला दुखापत झाल्याने तो या सामन्यांमध्ये दिसणार नाही.
सूर्यकुमारने ३ सामन्यांच्या टी २० मालिकेत १०७ धावा केल्या. होत्या. अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत त्याने ३ सामन्यात १०४ धावा केल्या. त्याला टी-२० मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताबही मिळाला. तिसऱ्या टी २० मध्ये त्याने ६५ धावांच्या खेळीत ७ षटकार मारले आणि व्यंकटेश अय्यरसोबत मोठी भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले.
महत्वाच्या बातम्या-
पिवळ्या साडीतील मॅडम परतल्या ड्युटीवर, मतदानाच्या दिवशी पुन्हा बनल्या चर्चेचा विषय
व्हॅलेंटाईन डे दिवशी पतीने लॉटरीचं तिकीट दिल्याने संतापली पत्नी, नंतर त्याच लॉटरीतून जिंकले १० कोटी
नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला लावणार, किरीट सोमय्यांचा इशारा