युक्रेन हे जगातील सर्वात मोठे सरोगसी मार्केट आहे. युक्रेनमध्ये सरोगसीला कायदेशीर मान्यता आहे. म्हणजेच तेथे मुले जन्माला घालणे किफायतशीर आहे. यामुळेच सरोगसीद्वारे मूल हवे असलेल्यांची पहिली पसंती युक्रेनला आहे. अशी हजारो मुले दरवर्षी इथे जन्माला येतात, ज्यांचे पालक अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि पाश्चिमात्य देशांतील असतात. (surrogate mother in ukraine)
युक्रेनच्या या भरभराटीच्या उद्योगामागील सत्य खूप भयानक आहे. ही वेदना त्या सरोगेट मातांची आहे ज्या पोटासाठी गर्भाचा व्यवहार करतात. आधी लॉकडाऊन आणि आता युद्धामुळे या उद्योगाचे वेदनादायक वास्तव समोर आले आहे. शारीरिक आणि मानसिक यातना भोगणाऱ्या या मातांच्या वेदना आता जगासमोर येत आहेत.
युक्रेनमध्ये एका सरोगेट बाळासाठी एक जोडपे सुमारे ३४ लाख रुपये खर्च करते. तर अमेरिकेत हाच खर्च दुप्पट म्हणजे सुमारे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पण ज्या सरोगेट माता या मुलांना ९ महिने पोटात ठेवतात त्यांना फक्त ११ लाख रुपये दिले जातात. युद्धाची परिस्थिती नसतानाही सेवा देणाऱ्या कंपन्या या महिलांना प्राण्यांपेक्षाही वाईट स्थितीत ठेवतात. २-२ सरोगेट मातांना एका बेडवर ठेवले जाते.
पैशासाठी सरोगेट मदर बनणाऱ्या एलिनाची कहाणी खूप वेदनादायक आहे. आपल्या मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी एलिनाने २०१६ मध्ये सरोगेट मदर बनण्याचा निर्णय घेतला. एलिनाला बायोटेक्सकॉमच्या जाहीरातीच्या माध्यमातून याबाबत माहिती मिळाली होती. कमी वेळेत जास्त पैसे मिळतात अशी माहिती एलिनाला दिली होती.
अशा परिस्थितीत एलिनाने करार मंजूर केला. त्या बदल्यात तिला १० लाख रुपये आणि चांगल्या देखभालीचे आश्वासन देण्यात आले होते. बायोटेक्सकॉम ही युक्रेनमधील सर्वात मोठी सरोगसी कंपनी आहे. युक्रेनमध्ये सरोगसीद्वारे जन्मलेल्या सर्व बाळांपैकी निम्म्या बाळांचा जन्म बायोटेक्सकॉम येथे होतो.
२०१७ मध्ये, एलिना रोमानियातील एका जोडप्याची सरोगेट मदर बनली, परंतु एलिनाला गरोदरपणात त्रासाला सामोरे जावे लागले. कंपनीने एलिनाला एका छोट्या अपार्टमेंटमध्ये ठेवले. जिथे एलिनाला कंपनीच्या इतर सरोगेट मदरसोबत एकाच बेडवर झोपावे लागले. त्यातल्या बऱ्याच महिला गावातील किंवा लहान शहरांतील होत्या. ना जेवणाची योग्य व्यवस्था होती ना राहण्याची योग्य व्यवस्था. त्यांना प्राण्यांप्रमाणे तिथे ठेवले जात होते,
एलिनाचा त्रास तिथेच संपला नाही. खर्च वाचवण्यासाठी कंपनीने तिला प्रसूतीसाठी कीव येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. या रुग्णालयाची अवस्था आणखीनच भयंकर होती. तिथे चांगल्या पाण्याची सोय सुद्धा नव्हती. रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांचे वर्तन या महिलांशी अत्यंत उद्धट होते.
मुलाच्या जन्मानंतर, एलिनाची तब्येत खुप खालावली. पोटात प्लेसेंटा राहिल्याने तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. असे असतानाही कंपनीने त्याची दखल घेतली नाही. कारण त्यांना त्यांच्या कामाची गोष्ट मिळाली होती, ती म्हणजे एक सरोगेट बेबी. ज्याच्या मदतीने ते रोमानियन दाम्पत्याकडून मोठी रक्कम वसूल करण्याच्या तयारीत होते. पण तिथेच एलिना जीवन-मरणाशी झुंज देत होती.
अशीच एक कहाणी कीवची रहिवासी असलेल्या शुल्झेन्स्काची आहे. तिने बँकेचे कर्ज फेडण्यासाठी एका इटालियन जोडप्याच्या बाळाची आई होण्याचा निर्णय घेतला. गर्भधारणेच्या चाचणीत असे दिसून आले की शुल्झेन्स्का चार गर्भ धारण करत होती, परंतु इटालियन जोडप्याला फक्त एकाची गरज होती.
अशा परिस्थितीत त्यांच्या कंपनीने शस्त्रक्रियेद्वारे तीन भ्रूण काढले. शुल्झेन्स्काला याबद्दल कधीही विचारले गेले नाही. या शस्त्रक्रियेमुळेच तिला कॅन्सर झाला, असे शुलझेन्स्काने म्हटले आहे. शुल्जेन्स्काला उपचारासाठी इतका खर्च करावा लागला की तिचे बँकेचे कर्ज पूर्वीपेक्षा जास्त झाले.
महत्वाच्या बातम्या-
माधूरी दीक्षितने आलिशान घर घेतलं भाड्याने; महिन्याचं भाडं ऐकून डोळे होतील पांढरे
आता MIM ला विरोध करणाऱ्या शिवसेनेने महापौरपदासाठी केली होती मुस्लिम लीगशी युती
..त्यामुळे दोन वर्षांपासून मी अंकिता लोखंडेच्या घरी घरजावई बनून राहतोय, विक्की जैनचा मोठा खुलासा