Share

वडिलांच्या निधनानंतर सुरेश रैनावर कोसळला दु:खाचा डोंगर; म्हणाला, वडील गमावल्यानंतर माझी..

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनाचे (suresh raina) वडील त्रिलोकचंद रैना (trilokachand raina) यांचे रविवारी निधन झाले. ते दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी रैनाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. रैनाने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहीले की, मी माझी सपोर्ट सिस्टीम गमावली आहे. (suresh raina post about his father)

35 वर्षीय फलंदाज रैनाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर वडिलांसोबतचा एक जुना फोटो शेअर करत लिहिले की, ‘वडील गमावल्याचे दु:ख शब्दात व्यक्त करता येणार नाही. काल मी माझे वडील गमावले, त्यासोबत माझी सपोर्ट सिस्टीमही गेली. वडील गेल्यानंतर माझी ताकद संपली. शेवटच्या श्वासापर्यंत ते लढत राहिले.

पुढे तो म्हणाला की, देव तुमच्या आत्म्याला शांती देवो बाबा. तुमची नेहमीच आठवण येईल. सुरेश रैनाचे वडील लष्करातून निवृत्त झाले होते. हरभजन सिंग, चेन्नई सुपर किंग्जने रैनाच्या वडिलांच्या श्रद्धांजली वाहताना त्याच्या कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.

सुरेश रैना 2011 च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग आहे. त्याने भारतासाठी 18 कसोटी आणि 226 एकदिवसीय सामने आणि 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रैना भारताकडून शेवटचा सामना 2018 मध्ये खेळला होता. 15 ऑगस्ट 2020 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकला होता.

त्याच दिवशी महेंद्रसिंग धोनीनेही आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पुर्णविराम लावला होता. आयपीएलच्या १५ व्या मोसमात सुरेश रैनाला चेन्नई सुपर किंग्जने कायम ठेवले नाही. २०२१ मध्ये सीएसकेच्या विजेतेपदाचा तो एक भाग होता. आयपीएल 14 मध्ये त्याने 12 सामने खेळले, ज्यामध्ये रैनाने फक्त १६० धावा केल्या होत्या.

सीएसकेने राखून ठेवलेल्या चार खेळाडूंमध्ये धोनी, रवींद्र जडेजा, मोईन अली आणि रुतुराज गायकवाड यांचा समावेश आहे. आयपीएल 2022 च्या लिलावात रैनाने त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली आहे. IPL 2022 चा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला होणार आहे.

महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरे गेल्या १५ दिवसांत प्रचंड अस्वस्थ आहेत कारण.., डिस्चार्ज मिळताच सोमय्या बरसले
रुपाली पाटलांनी केले फडणवीसांचे तोंडभरून कौतुक; म्हणाल्या, ‘ही’ राजकीय सुंदरता टिकवली पाहिजे
लता मंगेशकर यांचे खरे नाव होते ‘हेमा’, वडिलांनी ‘या’ कारणामुळे बदलले होते नाव, रंजक आहे किस्सा
VIDEO: विमानतळावरच भांडू लागले मलायका-अरबाज? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now