देशातल्या ब्राम्हणवादी लोकांनी कब्जा केलेल्या दलितांच्या जमिनी माघारी घ्या; दलित पँथरची मागणी

दलित पँथरच्या चळवळीला रविवारी ५० वर्षे पुर्ण झाली आहे. त्या निमित्ताने दलित युथ पँथरने चैत्यभूमीवर पँथरच्या सुवर्णमहोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यांची भीमराव आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती होती. (suraj yendage in dalit panther event)

देशातील शोषित, पीडित दीन-दलितांना न्याय मिळवून देणारी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात लढणाऱ्या दलित पँथर संघटनेला ५० वर्षे पूर्ण झाली आहे. असे असताना आता हार्वर्ड विद्यापीठातील डॉ. सुरज येंगडे यांनी एक मागणी केली आहे.

देशातल्या ब्राम्हणवादी लोकांनी कब्जा केलेल्या दलितांच्या जमिनी माघारी घ्या, अशी मागणी सुरज येंडगे यांनी केली आहे. आपला प्राथमिक लढा हा जमिनीचा आहे, त्यामुळे आपण दलितांच्या जमिनी माघारी घेतल्या पाहिजे, असे सुरज यांनी म्हटले आहे.

जमिन तुम्हाला आत्मबळ देते, जमिन तुम्हाला तुम्हाला ओळख देते. या देशावर कब्जा करणारे ब्राम्हणवादी लोक आहेत, त्यांनी दलितांच्या जमिनी घेतल्या आहे. जमिनीचे कायदे आहेत, त्यानुसार आपण त्या जमिनी घेतल्या पाहिजे, असे सुरज येंगडे यांनी म्हटले आहे.

तसेच तुमच्या मुलांना परदेशात शिकण्यासाठी पाठवा, तयार करा, त्यांना शिकवा. पैसे कधीही कमी पडत नसतात. मुलामुलींना परदेशात शिकण्यासाठी तयार करा. त्यांना महाराष्ट्र सरकार किंवा ज्या युनिव्हर्सिटीत शिकायचे असते, ती युनिव्हर्सिटी त्यांना शिष्यवृत्ती देत असते, असे सुरज येंगडे यांनी म्हटले आहे.

१९७२ साली मुंबईत स्थापन झालेल्या दलित पँथरला आता ५० वर्षे पुर्ण झालेली आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रात नांदेडमध्ये दलित-ब्लॅक पँथरच्या अभ्यासकांनी आणि कार्यकर्त्यांनी दोन दिवसीय परीषद आयोजित केली होती. त्यावेळी चळवळीचे सहसंस्थापक ज वि पवार आणि हार्वर्ड विद्यापीठातील सुरज येंडगे यांनी या परीषदेत सहभाग दर्शवला होता.

महत्वाच्या बातम्या-
…तर भारत पाकिस्तानचे तीन तुकडे करुन टाकेल; इम्रान खान यांचे धक्कादायक विधान
दिनेश कार्तिकसोबत हार्दिक पांड्याने निभावली मैत्री, स्वता कार्तिकने केले कौतुक, म्हणाला…
धक्क्यावर धक्के! हार्दिक पटेलची फोडाफोडीला सुरवात, ‘या’ बड्या काँग्रेस नेत्याला आणले भाजपमध्ये