महाराष्ट्र भूषण सोहळा मोठा दिमाखात पार पडला असला तरीही या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. हा सोहळा मुंबई परिसरातील खारघर येथे पार पडला. या कार्यक्रमात उष्माघातामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू उष्माघातामुळे झालेले नसून अयोग्य व्यवस्थापनेमुळे झाले असल्याचा आरोप सत्ताधारी पक्ष व आयोजकांवर केला जात आहे.
भव्यदिव्य कार्यक्रम भर उन्हात घेतल्यामुळे काहींची प्रकृती चिंताजनक झाली. या संपूर्ण प्रकरणाचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अशातच आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंट वरून एक फोटो शेअर करत गंभीर आरोप केले आहे.
ट्विट करताना सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी लिहिलेले की, शाही जेवण… खारघर येथे निष्पाप लोकांचे तहान-भूकेने जीव जात होते. सत्ताधारी मात्र शामियान्यात “शाही” भोजनावर ताव मारत होते. सत्तेच्या नशेत भावना पण मेल्या आहेत, असे लिहीत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टिका केली.
शाही जेवण
खारघर येथे निष्पाप लोकांचे तहान-भूकेने जीव जात होते.सत्ताधारी मात्र शामियान्यात "शाही" भोजनावर ताव मारत होते.
सत्तेच्या नशेत भावना पण मेल्या आहेत. pic.twitter.com/xATU7jRR1V— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) April 20, 2023
तसेच, शेअर केलेल्या फोटोंमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील मंत्री आणि आयोजक जेवण करताना दिसत आहेत. सुरुवातीला चेंगराचेंगरीमुळे लोकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं. पण माध्यमातील वृत्तानुसार, अन्न व पाणी न मिळाल्यामुळे लोकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, सरकारच्या निष्काळजीपणामुळे या लोकांचा बळी गेल्याचा आरोप केला जात आहे. तसेच, हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे. त्यामुळे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना २० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी व जखमींना ५ लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार अमित शहा यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम शासकीय असल्यामुळे शासनाने आयोजित केला होता. यासाठी तब्बल १४कोटी रुपये खर्च करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
माधुरी दीक्षितने खरेदी केली जगातील सर्वात वेगवान कार, किंमत ऐकून बसेल धक्का
राज्यात लवकरच राजकीय भूकंप! ३५ वर्षे आमदार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान, राजकीय वर्तुळात खळबळ