गेल्या काही दिवसांपासून उद्योगपती गौतम अदानींच्या व्यवसायाची चांगलीच चर्चा आहे. पुरंदर-बारामतीच्या सीमेवर गौतम अदानींचे खाजगी विमानतळ होणार असल्याचे म्हटले जात आहे. अशात ते सायन्स अँड इनोव्हेन ऍक्टीव्हिटी सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने बारामतीला आले होते. (supriya sule statement on gautam adani)
अदानींना अचानक बारामतीला पाहून अनेकजण हैराण झाले होते. यावेळी गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली तसेच तिथे जेवणही केले. जवळपास पाऊण-तास अदानी शरद पवारांच्या निवास्थानी होते.
अदानींना शरद पवारांच्या निवासस्थानी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता यावर राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गौतमभाईंना बारातमी काही नवीन नाही. पवार आणि अदानी कुटुंबांचे नाते गेल्या २५-३० वर्षांपासून आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
गौतमभाई आणि प्रितीभाई दोघेजण आवर्जून अहबादवरुन बारामतीला आले. गौतमभाईंना बारामती काही नवीन नाहीये. अदानी आणि पवार कुटुंबियांचे नाते गेल्या २५-३० वर्षांपासून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गौतमभाई दिवाळीला दरवर्षी बारामतीला येतातच, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
तसेच बारामतीची खरी दिवाळी सायन्स सेंटरच्या माध्यमातून साजरी होत आहे. त्यासाठी योगायोगाने गौतमभाई उपस्थित राहिले आहे. बारामतीत काहीतरी चांगलं घडतंय म्हणूनच एवढे सायंटीस्ट बारामतीत उपस्थित राहिले आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अशात कार्यक्रमाच्यावेळी आयोजकांनी गौतम अदानी यांना भाषणाची विनंती केली होती. पण त्यांनी भाषण देणे टाळले. या दौऱ्यावर अदानी यांची पत्नी प्रिती अदानी या सुद्धा होत्या. यावेळी त्यांना बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तुंसह सेंद्रीय पद्धतीने उत्पादीत केलेल्या भाजीपाल्याच्या टोपल्याही दिल्या.
महत्वाच्या बातम्या-
प्रचाराला जाण्यास नकार दिल्याने भाजप नेत्याने केली पत्नीची गोळ्या झाडून हत्या, उडाली खळबळ
ज्याने आईमुळे १०० मुलांची केली हत्या त्या सिरीअल किलरची कहाणी दिसणार मोठ्या पडद्यावर
टॉमेटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचे हे षडयंत्र, सदाभाऊंचा इशारा कोणाकडे?