supriya sule on urfi javed | प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरुन राज्यात वाद सुरु आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच तिच्याविरोधात चित्रा वाघ रस्त्यावरही उतरल्या होत्या. जिथे उर्फी दिसेल तिथेच तिच्या कानशिलात मारेल असेही चित्रा वाघांनी म्हटले होते.
आता हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.चित्रा वाघ यांच्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुद्धा टीका केली होती. कोणी कोणते कपडे घालायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले होते.
अशात या वादात खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील उडी घेतली आहे. उर्फी जावेद आणि इतर महिलांवरील प्रकरणावरुन भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वाद सुरु आहे. सुप्रिया सुळे शनिवारी एका कार्यक्रमात आल्या होत्या. तिथे त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
राष्ट्रवादीचे नेतेच टीकांना सुरुवात करतात असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यालाही सुळेंनी उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, देवेंद्र जी माझ्या घरात जशी एक मुलगी आहे तशी तुमच्या घरात देखील एक मुलगी आहे. त्यामुळे महिलांवरील आरोप प्रत्यारोप थांबले पाहिजे.
तसेच महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा असून महिलांचा सन्मान करणारा आहे. ती महिला कोणाची तरी आई, बहिण, पत्नी, मैत्रीण असते. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. माझी फडणवीसांना नम्रविनंती आहे की त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पुढाकार घ्यावा. आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढाकार घेऊ, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उर्फीवर टीका करणाऱ्या चित्रा वाघांवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर खुपच भडकल्या होत्या. कोणी कोणते कपडे परीधान करायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असेल. पण इतरांना तो अश्लील वाटत नसेल. त्यामुळे आयोग अशा गोष्टींमध्ये वेळ घालवू शकत नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
दोन बसची भीषण टक्कर, 40 ठार, 87 जखमी; काळीज चिरणारा आक्रोश करत पळाले लोकं..
जेव्हा राज ठाकरेंनी भैय्या टॅक्सीवाल्याला रस्त्यातच अडवून खाली उतरवलं; ठाकरेंनीच सांगीतला किस्सा
ved : रितेशच्या वेडला लोकांचा तुफान प्रतिसाद, ९ व्या दिवशीच्या कमाईचा आकडा पाहून बसेल धक्का