Share

बाळासाहेब ठाकरे आणि मराठीवर खरंच प्रेम असेल तर…; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त केलेल्या भाषणात मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच ठाण्यात घेतलेल्या सभेत राज ठाकरेंनी भोंगे ३ मे पर्यंत उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. जर ३ मे पर्तंत भोंगे खाली आले नाही, तर देशभरात हनुमान चालिसा लावू असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. (supriya sule criticize raj thackeray)

राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच यावर सत्ताधारी नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर टीका करत आहे. आता राज ठाकरेंच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही आणि जर कोणी गडबड केली तर ते ऐकूण घेणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी केंद्रा सरकारच्या डेटाचाही संदर्भ दिला आहे.

केंद्र सरकारचा डेटा सांगतो की, नवीन उद्योगांच्या उभारणीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करणे, तुम्हाला शोभत नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता लगावला आहे. महाराष्ट्राची बदनामी करु नका, असेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले आहे.

बाळासाहेब ठाकरे आणि मराठीवर खरंच प्रेम असेल तर खाल्ल्या मिठाला जागा. महाराष्ट्राची बदनामी करु नका. तुम्हाला जे भाषण करायचे ते करा पण आम्हाला कामे द्या. भाषण देऊन दोघांच्या आयुष्यात अजिबात फरक पडणार नाही. महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही आणि जर कोणी गडबड केली तर ऐकूण घेणार नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात दिलेल्या भाषणात ३ मेपर्यंत भोंगे काढण्याचा अल्टिमेटम दिला आहे. ३ मेपर्यंत भोंगे काढले नाही, तर मनसे स्टाईल हनूमान चालिसा लावून उत्तर देऊ, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘मुख्यमंत्र्याला आळशीपणा परवडणारा नाही,’ मुख्यमंत्र्यांनी स्वत: बद्दलच केली टीप्पणी, वाचा का म्हणाले असं?
आलिया-रणबीरच्या मेहंदीच्या वेळी करण जोहरसोबत घडला होता मजेशीर प्रकार, वाचून पोट धरून हसाल
VIDEO: हार घालताच नवरीने नवरदेवाच्या दिल्या दणादण कानाखाली, तरीही शांतीत पार पडला लग्नसमारंभ

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now