पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. अशात ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देहूत आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी भाषण देत लोकांना संबोधित केले. (supriya sule angry on modi event)
या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पुस्तकाचेही प्रकाशन केले. पण मोदींची देहू भेट एका वेगळ्याच कारणामुळे सर्वात जास्त चर्चेत आली आहे. ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषणाची संधी न देणे. या कार्यक्रमावेळी पंतप्रधानांचे भाषण झाले, पण अजित पवारांना भाषणाची संधी दिली गेली नाही.
अजित पवार राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित झाले होते. तसेच या कार्यक्रमाला भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा उपस्थित होते. मोदींनी यावेळी उपस्थितांचे मार्गदर्शन करत भाषण केले, पण अजित पवारांना संधी मिळाली नाही.
अजित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूलाच बसलेले होते. तर दुसऱ्या बाजूला फडणवीस बसलेले होते. यावेळी सर्वात आधी देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं. त्यानंतर सुत्रसंचालकांनी थेट मोदींचे नाव घेतले. त्यामुळे मोदी भाषणाला गेले. पण या संपूर्ण कार्यक्रमात अजित पवारांच्या भाषणाला संधीच दिली गेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते नाराजी व्यक्त करताना दिसत आहे.
आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार अजित पवारांना भाषणाची संधी द्यायला हवी होती, पण ती दिली गेली नाही. विरोधी पक्षनेत्यांना भाषणाची संधी मिळते, पण उपमुख्यमंत्र्यांना नाही ही अयोग्य गोष्ट आहे. ही दडपशाही असून आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचे काम करण्यात आले आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
तसेच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. अजितदादा हे महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री आहेत, प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी जर शासकीय प्रोटोकॉल पाळला नसेल व काही कारण नसताना देवेंद्र फडणवीस यांना बोलते करून स्वपक्षाचा प्रचार केला असेल हा संविधानिक पदाचा अपमान आहे मोदीजी चूक दुरुस्त करा, असे अमोट मिटकरी यांनी ट्विट करत म्हटले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस भाषणासाठी हापापलेले आहे, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
सापासारखे सरपटणारे एलियन्स पृथ्वीवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात; वैज्ञानिकांनी दिला ‘हा’ इशारा
एवढ्या दोन वर्षात सुशांतच्या मृत्युचा तपास कुठपर्यंत पोहोचला? मुख्य आरोपी आता काय करतायत?
दिपिका पदूकोनची तब्येत बिघडली; ह्रदयविकाराच्या त्रासामुळे तातडीने हाॅस्पिटलमध्ये केलं दाखल