डोबिंवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीत एका महिलेचा मृत्युदेह चक्क सोफासेटमध्ये आढळून आल्याने संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवलीच्या दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात ही घटना घडली आहे. (supriya murder in mumbai)
गळा आवळून या महिलेची हत्या करण्यात आली आली आहे. या महिलेच्या मृत्युमागे नेमका कुणाचा हात आहे, याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. पोलिस या प्रकरणी तपास करत आहे. ज्या महिलेची हत्या करण्यात आली, त्या महिलेचे नाव सुप्रिया असे आहे.
सुप्रिया घरी एकटी असताना तिच्यासोबत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच तातडीने याचा तपास सुरु केला आहे. प्राथमिक तपासातून या महिलेची हत्या करण्यात आली आहे, असे समोर आले आहे.
शिवशक्ती नगर परीसरातील ओम रेसिडेन्सीच्या बि विंगमध्ये राहणारे किशोर शिंदे हे सकाळी कामावर गेले होते. सुप्रिया ही किशोर यांची पत्नी आहे. त्यावेळी त्यांचा मुलगाही शाळेत गेला होता. त्यामुळे सुप्रिया घरी एकटीच होती. संध्याकाळी जेव्हा किशोर घरी आले, तेव्हा त्यांनी सुप्रियाचा शोध सुरु केला. मित्रमंडळी-नातेवाईक सर्वांना विचारपूस केली कोणालाही ती कुठे गेली हे माहित नव्हते.
किशोर हे पत्नी हरवल्याची तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. रात्र झाल्यानंतर घरात दररोज येणाऱ्या जाणाऱ्यांना सोफा विचित्र वाटला. त्यांनी तो सोफा चाचपला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण सुप्रियाचा मृतदेह सोफ्यात कोंबून ठेवला होता.
सुप्रियाचा मृतदेह आता पॉस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अखेर तिची हत्या कोणी व कशा करीता केली. तिच्यासोबत काही गैरप्रकार झाला आहे का? याचा तपास पोलिस करत आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
बॉलिवूडची ‘ही’ सुंदर अभिनेत्री दिसली मुंबईच्या रस्त्यांवर कचरा उचलताना, फोटो होतायत व्हायरल
‘मनी हाईस्ट’ पाहून अपहरण करायचा ऑटोचालक, पोलिसांनी केली अटक
विराटबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकला रोहित शर्मा, म्हणाला, ”तुम्ही मिडीयावाले गप्प बसलात तर बरं होईल”