शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सध्या शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. तसेच त्यांच्यासोबत अनेक मंत्रीही जात आहे. (supreme court shocking decision)
एकनाथ शिंदे यांचा गट हा मजबूत होताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. १२ जूलैपर्यंत बंडखोर आमदारांचे निलंबन शिवसेनेला करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी ११ जूलैला होणार आहे. तसेच एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर आज सुनावणी देताना न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे. न्यायालयाने उपसभापती अजय चौधरी, सुनील प्रभू आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पाच दिवसांत या नोटीसला उत्तर द्यावे, असे म्हटले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जूलै रोजी होणार आहे. तसेच आमदारांना १२ जूलैपर्यंत आपली बाजू मांडण्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. पण तोपर्यंत शिवसेनेला बंडखोर आमदारांवर कारवाई करता येणार नाही.
आज सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी पार पडली आहे. यावेळी युक्तीवादादरम्यान, आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन उपाध्यक्षांची बाजू मांडणारे वकील धवन यांनी केले आहे.
धवन यांचे विधान रेकॉर्डवर घेण्याची विनंती शिंदेंच्या वकीलांनी केली होती. त्यांची ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. तसेच याशिवाय आमदार, त्यांचे कुटुंबिय आणि त्यांच्या मालमत्तांना हानी होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही आदेश सर्वोच्च न्यायालायने दिले आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदे दिघे साहेबांचा आदर्श सांगतात पण ते कधीच दिघे साहेब होऊ शकत नाही; मनसेने शिंदेंना जागा दाखवली होती
‘त्या’ एका ओव्हरमुळे पालटले नशीब, दीपक हु्ड्डा अन् हार्दिक पांड्याने लिहीली विजयाची गाथा
लग्नानंतर दोन महीन्यातच आलिया भट आणि रणबीर कपूर बनणार आईवडील, गुड न्युज शेअर करत म्हणाले…..