कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलाच्या संगोपनाची जबाबदारी आईच्या आई-वडिलांकडे देण्याऐवजी वडिलांच्या आईवडिलांकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, भारतीय समाजात वडिलांचे आईवडिल आपल्या नातवंडांची चांगली काळजी घेतात. (supreme court on guardianship on grandson)
विशेष म्हणजे २०२१ मध्ये जेव्हा कोविडची दुसरी लाट शिगेला पोहोचली होती, तेव्हा एका मुलाच्या वडिलांचा १३ मे रोजी आणि १२ जून रोजी आईचा मृत्यू झाला होता. आजी-आजोबा मुलाला त्याच्या आईच्या अंतिम संस्कारासाठी अहमदाबाद येथे आणले होते आणि त्यानंतर ते पुन्हा घेऊन गेले. त्यावेळी वडिलांकडील आजीआजोबांनी नातवाच्या शिक्षणासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर न्यायालयाने निर्णय घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, भारतीय समाजात वडिलांकडील आजी-आजोबा आपल्या नातवंडांची नेहमीच ‘चांगली काळजी’ घेतात. काही काळापूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने मुलाचा ताबा त्याच्या मावशीकडे दिला होता.
न्यायमूर्ती एमआर शाह यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवताना सांगितले की, आपल्या समाजातील वडिलांकडील आजी-आजोबा आपल्या नातवंडांची नेहमीच चांगली काळजी घेतात. ते भावनिकदृष्ट्या त्यांच्या नातवंडांच्या जवळ असतात आणि एका अल्पवयीन मुलास दाहोदपेक्षा अहमदाबादमध्ये चांगले शिक्षण मिळेल.
तसेच मावशीला त्या मुलाला भेटण्याचा अधिकार असू शकतो आणि ती तिच्या सोयीनुसार मुलाची भेट घेऊ शकते, असेही खंडपीठाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने सांगितले होते की, मुलगा त्याच्या आईच्या वडिलांकडील आजी-आजोबांकडे सोयीस्कर आहे. पण आता सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय बाजूला ठेवला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, आईकडील आजीआजोबांपेक्षा वडिलांकडील आजीआजोबांचा ६ वर्षांच्या मुलावर जास्त अधिकार आहे. मुलाच्या आरोग्य आणि शिक्षणाची काळजी ते जास्त घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना मुलाचा ताबा मिळायला हवा.
दरम्यान, उच्च न्यायालयाने मुलाच्या ४६ वर्षीय मावशीला ती अविवाहित, केंद्र सरकारमध्ये काम करत असून संयुक्त कुटुंबात राहात असल्याच्या कारणावरून तिचा ताबा मंजूर केला होता. मुलाच्या संगोपनासाठी ते योग्य ठरेल असे सांगत न्यायालयाने मावशीकडे ताबा दिला होता.
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्याने घेतला भावाच्या ‘अपमानाचा’ बदला दिनेश कार्तिककडून? 3 वर्ष जुनी घटना झाली ताजी
त्याने कॅच सोडला म्हणून सामना हारलो नाही तर.., श्रेयस अय्यरच्या समर्थनार्थ इशान किशन मैदानात
Crorepati Tips: आजच चहा पिणे सोडून द्या, ‘असे’ व्हा करोडपती, मग करा मज्जाच मज्जा!






