मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे १०० कोटी वसूली प्रकरणी अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहे. ईडीने कारवाई करताना अनिल देशमुखांसह त्यांच्या कुटुंबाचीही संपत्ती जप्त केली होती. पण आता यावरुन सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले आहे. (supreme court on anil deshmukh sons property)
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांना दिलासा देत ईडीला फटकारले आहे. ईडीने अनिल देशमुख यांचे पुत्र योगेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी शीतल देशमुख यांच्या वैयक्तिक ११ मालमत्ता जप्त केल्या होत्या.त्या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले आहे. तसेच त्या मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आहे.
ईडीने १८० दिवसानंतर देशमुख कुटुंबांची मालमत्ता जप्त केली आहे. पण कायद्यानुसार १८० दिवसानंतर अशाप्रकारे कारवाई करता येत नाही. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने ईडीला आदेश दिला आहे. त्या आदेशानुसार, अनिल देशमुखांच्या पुत्राच्या आणि सुन यांच्या मालमत्ता परत कराव्या लागणार आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर अनिल देशमुख यांच्या वकिलांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारत अनिल देशमुखांच्या कुटुबियांना दिलासा दिला आहे. आता त्यांना त्यांच्या मालमत्ताही परत मिळणार आहे.
दरम्यान, अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहे. त्यांच्यावर परमबीर सिंगांनी १०० कोटी वसूलीचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीमाना दिला होता. ईडीने चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले होत. ते सध्या अजूनही तुरुंगात आहे.
सध्या अनिल देशमुख हे सीबीआयच्या कोठडीत आहे. पण असे असतानाही ईडीने त्यांच्या मुलाची संपत्ती जप्त केली होती. पण आता सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुखांच्या बाजूने निकाल दिलेला आहे. त्यामुळे आता अनिल देशमुखांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
”शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यात संजय राऊतांचाच हात तर नाही ना?”
उदयनराजे संध्याकाळी कोणत्या परिस्थितीत बोलले हे तपासलेे पाहिजे, जयंत पाटलांचा सणसणीत टोला
फक्त चित्रपटात नाही, तर खऱ्या आयुष्यात पण हिरो आहे महेश बाबू, स्वत:च्या पैशांनी ३० मुलांवर केली हार्ट सर्जरी