अथिया शेट्टी आणि केएल राहूल लवकरच करणार लग्न? सुनील शेट्टी म्हणाला…

सध्या बॉलिवूडमध्ये सुनील शेट्टीची लाडकी मुलगी अथिया शेट्टीच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. क्रिकेटर केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे लवकरच लग्न होणार असल्याची बातमी इंटरनेटवर सगळीकडे आहे. पुढील तीन महिन्यांत अथिया आणि टीम इंडियाचा उपकर्णधार विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. (sunil shetty talk about athiya and kl rahul wedding)

अथिया आणि केएल राहुलचे पुढील तीन महिन्यात लग्न होणार की नाही याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते खुपच उत्सुक आहे. त्यामुळे सेलिब्रिटी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. अशात लग्नाच्या बातमीवर सुनील शेट्टीने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्याच वेळी, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे. अलीकडेच केएल राहुलच्या पालकांनीही अथियाची मुंबईत भेट घेतली. यानंतर अथिया आणि केएल राहुल लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.

अथियाच्या लग्नाची बातमी ऐकल्यानंतर सुनील शेट्टीने याबाबतची सत्यता सांगितली आहे. सुनील शेट्टी जे म्हटला ते ऐकून चाहत्यांना धक्काही बसू शकतो. सुनील शेट्टीने केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाची बातमी अफवा असल्याचे सांगितले आहे.

मी माध्यमांवर तीन महिन्यात अथिया आणि राहूल लग्न करणार आहे, असे ऐकले. पण या सर्व बातम्या अफवा आहे. सध्या अथियाच्या लग्नाचे कोणतेही प्लॅनिंग नाही आणि कोणतीही तयारी सुरू नाही, असे सुनील शेट्टीने म्हटले आहे. सुनील शेट्टीच्या या प्रतिक्रियेमुळे चाहते मात्र नाराज झाले आहे.

सुनील शेट्टीच्या वक्तव्याने केएल राहुल आणि अथियाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, पण त्यांचं लग्न होणार हे नक्की आहे. त्यामुळे निराश होण्याची गरज नाही. अथिया आणि केएल राहुलबद्दलची ही अफवा खरी ठरते की नाही हे तर पुढील तीन महिनेच सांगू शकतील.

अथिया आणि राहुलचे लग्न झाले तर क्रिकेट आणि बॉलीवूडची ही आणखी एक जोडी असेल. त्यांच्याआधी विराट-अनुष्का, हार्दिक पांड्या-नताशा स्टॅनकोविक, हरभजन सिंग-गीता बसरा, युवराज सिंग-हेजल कीच आणि झहीर खान-सागरिका घाटगे यांचे लग्न झालेले आहे.

महत्वाच्या बातम्या-
शिंदे सरकारने आपला शब्द पाळला, राज्यातील पेट्रोल ५ आणि डिझेल ३ रुपयांनी केले स्वस्त
VIDEO: तुम्ही ३ महिने माझं डोकं खात आहात, आता खुश आहात का? रणबीरला भेटताच नीतू कपूर खुश
लंडनच्या रस्त्यावर पाठकबाईंनी पकडली राणादाची कॉलर, व्हायरल व्हिडिओची चर्चा