टीम इंडियाच्या सलग दोन पराभवानंतर अनेक दिग्गज संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची मागणी करत होते. त्यानंतर भारताने तिसरा सामना जिंकला. भारताचे माजी दिग्गज सुनील गावस्कर यांनीही एक वक्तव्य केलं होतं ज्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
टीम इंडियातील युवा खेळाडूच्या पदार्पणाच्या सामन्याची सुनील गावसकर आतुरतेने वाट पाहत आहेत. रविवारी कटकमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाला 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर संघात अनेक बदल पाहायला मिळतात.
टीम इंडियाच्या संघात समावेश असलेला युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकबाबत सुनील गावसकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सचिननंतर उमरान हा दुसरा खेळाडू आहे ज्याने मला प्रभावित केलं आहे असं गावसकर म्हणाले आहेत. उमरान मलिक आयपीएल 2022 पासून चर्चेत आहे.
आयपीएलच्या या मोसमात तो सर्वात वेगवान गोलंदाजी करणारा भारतीय गोलंदाज ठरला. उमरान मलिकबद्दल सुनील गावसकर म्हणाले, ‘मी ज्या खेळाडूला पहिल्यांदा बघून उत्साहित झालो तो सचिन तेंडुलकर. दुसरा खेळाडू उमरान मलिक आहे. ते म्हणाला की आता वेळ आली आहे की त्याला टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मिळाली पाहिजे.
भारताच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या उमरान मलिकला तिसऱ्या T20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. उमरान मलिकने आयपीएलमध्ये उमरान मलिकने आपल्या गतीने फलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते. या आयपीएल हंगामात त्याने 157 किमी प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता. त्याचबरोबर 14 सामन्यांत उमरान मलिकने 22 विकेट्स घेतल्या होत्या.
दरम्यान, भारताने तिसरा टी-२० सामना जिंकला जरी असला तरी भारताला आणखी दोन सामने सलग जिंकायचे आहेत. त्यांच्यासाठी पुढील प्रवास खडतर असणार आहे. सलग दोन सामने जिंकणे कठीण आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये अनेक खेळाडू आहेत जे सध्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामध्ये डेविड मिलरचं नाव सगळ्यात वरती आहे.
महत्वाच्या बातम्या
चला हवा येऊ द्या नंतर आता भारत गणेशपुरे, सागर कारंडे ‘या’ हिंदी शोमध्येही झळकणार, चाहते उत्सुक
रेकाॅर्डब्रेक! पुण्यातील ‘या’ किर्तनकाराने सलग १२ तास किर्तन करत केला अनोखा विक्रम; वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद
नो पार्कींग मध्ये पार्क केलेल्या गाडीचा फोटो काढा आणि ५०० रुपये मिळवा, नितीन गडकरींची घोषणा
खडसेंच्या पराभवासाठी भाजपनेच लावली फिल्डिंग? रावसाहेब दानवे म्हणाले, फडणवीस आणि मी एकत्र..