ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ५२ व्या वर्षी वॉर्नने जगाचा निरोप घेतला. वॉर्नच्या अचानक जाण्याने संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. वॉर्नच्या अचानक जाण्याने जगभरातील क्रिकेटपटूंकडून शोक व्यक्त केला जात आहे. पण याच दरम्यान भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वॉर्नच्या अचानक जाण्याबद्दल असे काही बोलले आहे, ज्यामुळे त्यांना ट्रोल केले जात आहे. (sunil gavaskar shocking statement on shane warne)
वॉर्नच्या निधनावर एका वाहिनीशी बोलताना गावसकर म्हणाले, तो नेहमीच खुलेपणाने आयुष्य जगला. नेहमी मला विचारायचा तू संध्याकाळी काय करतोस? चल एकत्र जेवायला जाऊया. तो नेहमी एका राजासारखं आयुष्य जगला, त्यामुळे कदाचित याच कारणामुळे त्याच्या हृदयाला ते सहन झाले नाही आणि इतक्या लवकर त्याचे निधन झाले.
दरम्यान, शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. वॉर्नचा मृतदेह त्याच्या व्हिलामध्ये सापडला होता. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना वाचवता आले नाही. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, वॉर्न मृत्यूच्या वेळी थायलंडमध्ये होता. वॉर्नच्या अचानक जाण्याने संपूर्ण क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे.
शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच त्याला जगातील महान लेग स्पिनर म्हणून ओळखले जाते. त्याच्या गोलंदाजीसमोर अनुभवी फलंदाजालाही घाम फुटायचा. मात्र, सचिन तेंडुलकरसमोर तो फारसा प्रभावी ठरला नाही, ही वेगळी बाब आहे.
शेन वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये ७०८ विकेट आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने २९३ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय तो आयपीएलच्या पहिल्या सिजनचे विजेतेपद पटकावणारा कर्णधार आहे. त्याने राजस्थान रॉयल्सला पहिली आयपीएल ट्रॉफी दिली.
इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकणारा पहिला कर्णधार होण्याचा विक्रम शेन वॉर्नच्या नावावर आहे. आयपीएल २००८ मध्ये, अनोळखी चेहऱ्यांनी वेढलेला राजस्थान रॉयल्सचा संघ विजेतेपद मिळवण्याच्या पात्रतेचा मानला जात नव्हता. अशा स्थितीत संघाचा चॅम्पियन होण्यासाठी वॉर्नची रणनीती जबाबदार मानली जात होती.
महत्वाच्या बातम्या-
झुंड चित्रपटासाठी अमिताभ बच्चनने दिला होता नकार, पण…; वाचा काय आहे आमिर खानचं झुंडसोबतचं कनेक्शन
पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या हातात चक्क भारताचा झेंडा, स्वत:ला वाचवण्यासाठी घेतला तिरंग्याचा आधार
युक्रेनमधील विद्यार्थ्यांची मोदींनी घेतली भेट; म्हणाले, याला आम्ही नाही तर आधीची सरकारेच जबाबदार