विराट कोहलीने जेव्हापासून कर्णधारपद सोडले तेव्हापासून त्याच्यावर अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल मिडीयावरही अनेक लोकांनी त्याच्या खराब फॉर्मवर टीका केली आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनीही कोहलीच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आजच्या सामन्यात असे पहिल्यांदाच झाले आहे की कोहली त्याच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या कर्णधाराच्या अधिपत्याखाली म्हणजे के एल राहुलच्या कर्णधारपदाखाली खेळत आहे.
अनेक लोकांचे कोहलीच्या आजच्या खेळीवर लक्ष आहे. कोहलीने जर आजही चांगला खेळ दाखवला नाही तर त्याच्यावर सगळीकडूनच टीकेचे झोड उठतील. पण ही पहिलीच वेळ नाहीये की विराटवर टीका झाली आहे. काही दिवसांपुर्वी सुनील गावस्कर यांनी विराटवर टीका केली होती ज्यामुळे वाद निर्माण झाला होता.
माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आरसीबी आणि पंजाबमधील सामन्यादरम्यान समालोचन करताना सुनील गावसकर यांनी विराटवर टीका करताना अनुष्काचाही उल्लेख केला ज्यानंतर सुनील गावसकर यांच्यावर टीकेचे झोड उठले होते.
विराटच्या चाहत्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केले होते. विराटची सुमार कामगिरी बघून गावसकर म्हणाले होते की, ‘ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने,’ असे त्यांनी म्हटले होते. गावसकरांच्या या टीकेवर अनुष्काने देखील प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली होती. अनुष्का म्हणाली होती की, ‘सुनील गावसकर, मी तुम्हाला सांगू इच्छिते की, तुम्ही केलेलं वक्तव्य हे अत्यंत त्रासदायक आहे.
एखाद्या क्रिकेटरच्या खराब कामगिरीसाठी तुम्ही त्याच्या पत्नीला दोषी कसं ठरवू शकता? तुम्ही तर कायम खेळाडूंच्या खासगी आयुष्याचा आदर केला आहे. मग हा आदर मला असावा असं तुम्हाला नाही वाटत का?’ दरम्यान, गावसकर यांनी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिले होते.
लोकांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला असून, ते वेगळ्या पद्धतीने समोर आणण्यात आले असल्याचे गावसकर यांनी सांगितले होते. वक्तव्याचे स्पष्टीकरण देताना पुढे गावसकर म्हणाले होते की, लॉकडाऊनमुळे खेळाडू योग्य प्रकारे सराव करु शकले नाहीत असे मला सांगायचे होते. त्यासाठी आपण विराट आणि अनुष्काचा सोसायटीच्या आवारात क्रिकेट खेळताना व्हायरल झालेल्या व्हिडीओचा दाखला दिला, असे ते म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
८३ चित्रपट पाहताना सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड रडला, सईने स्वत:च केला मोठा खुलासा
महाविकास आघाडीने भाजपचा उडवला धुव्वा, नगरपंचायतीत मिळवल्या सर्वात जास्त जागा
बच्चू भाऊंचा ‘प्रहार’, मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायत जिंकली, भाजपला भोपळा
रिअॅलिटी शोमध्ये मोदींची खिल्ली उडवल्याने सरकार संतापेल; मीडिया हाऊसला पाठवली नोटीस