आधी युट्यूब व्हिडीओ आणि मग मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणारा अभिनेता सुमित चव्हाण याची एक पोस्ट सध्या खुप व्हायरल होत आहे. तो सोशल मिडीयावर बराच ऍक्टीव्ह असतो. तो नेहमी फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असतो. सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण सध्या त्याच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
अलिकडेच त्याच्या वडिलांचे निधन झाले ज्यानंतर तो खुप दुखी आहे. वडिलांच्या निधनानंतर त्याने एक भावूक पोस्ट केली आहे. सुमितची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. वडिलांच्या निधनानंतर त्याने काही वडिलांचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्याने लिहीलं आहे की, बाप माणुस गेला..
दुखापासून खूप लांब, आनंदात लपून बसलो होतो, अचानक दुःख येतं आणि तुम्हाला धप्पा देतं, तुम्ही Out होता. 2001 मध्ये बाबांची मिल बंद झाली, मुलाचं शिक्षण मुंबईतच झालं पाहिजे, म्हणून ते मुंबईत थांबले, रिक्षा चालवुन आमचं शिक्षण पूर्ण केलं. शाळा, कॉलेज आणि परवा पर्यंत शूट साठी मला त्याच रिक्षातून सोडत होते.
त्यांची सगळी स्वप्न करत होतो, पण काही स्वप्न राहून गेली, गेले 21 वर्ष रिक्षा चालवली, आपल्या स्वतःच्या कार मध्ये बसून फिरवायच होतं, गावाला मोठा बंगला बांधायचा होता, बहिणीचं लग्न करून दयायचं होतं, मला मोठया पडदयावर बघायचं होत. पण मी हे सगळं नाही करू शकलो पूर्ण,मला उशीर झाला,आयुष्यभर ह्या गोष्टी मनाला टोचत राहतील.
काय पण साला नशीब आहे, ज्या दिवशी मी Film Industry मध्ये Entry घेतली, त्याच दिवशी बाबांनी Exit घेतली, एवढी वर्ष रिक्षा चालवली, आणि रिक्षातच आईच्या कुशीत जीव सोडला. बाबा तुम्ही आता star झालात, वरून बघत रहा, मी सगळी स्वप्न पूर्ण करेन, काळजी नका करू. ते कट्टर शिवसैनिक होते, त्यांना आपल्या आजूबाजूला गर्दी करायला आवडत होती, रात्री अचानक गेले तरी त्याच्यासाठी गर्दी झाली, ही त्यांनी कमावलेली माणसं होती.
मी खूप प्रेम करतो तुमच्यावर.. हे एकदा तुम्हाला बोलायचं होत, बाबा आपण पुन्हा भेटू , गप्पा मारू, तो पर्यंत आईची बहिणीची मी काळजी घेईन, राहिलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याची ताकत मला माझ्या जवळच्या मित्रांनी दिलीय. तुम्ही खूप धावपळ केली आता आराम करा, अशी भावनिक पोस्ट त्याने केली आहे. त्याच्या पोस्टवर अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.
महत्वाच्या बातम्या
सैल कपडे, नो मेकअप लूक आणि बरंच काही… ; पहा गरोदर आलिया भट्टचे Unseen फोटो
माझा राग मुंबईवर काढू नका, शिंदे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर उद्धव ठाकरेंनी घेतला आक्षेप
एकनाथ शिंदेंनी स्वतः रिक्षा चालवत दंगलीत वाचवला होता चिमुरड्याचा जीव, वाचा ‘तो’ थरारक किस्सा
फडणवीसांसह ब्राह्मण नेत्यांचं भाजपमध्ये खच्चीकरण; राजकीय आखाड्यात ब्राह्मण महासंघाची उडी