Share

सुख म्हणजे नक्की काय असतं: आरोप करणाऱ्या शालिनी-देवकीला गौरीने थेट दिली धमकी; म्हणाली…

टीव्हीवरील अनेक मालिका या चर्चेत असतात, त्यातलीच एक मालिका म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं. या मालिकेत अनेक नवनवीन वळणं येताना दिसून येत आहे. या मालिकेतील जयदीप आणि गौरीची जोडी लोकांना प्रचंड आवडली आहे. (sukh mhnje nkki kay ast gauri angry on shalini)

मालिकेत आता गौरीचं नवं रुप पाहायला मिळत आहे. मलिकेतील गौरी साधी भोळी असली तरी आता ती अरे ला कारे उत्तर देताना दिसून येणार आहे. पहिल्याच दिवशी ती शालिनी वहिणी आणि मानसीला धडा शिकवताना दिसून येणार आहे.

पहिल्याच दिवशी गौरीने शालिनी, जयदीप आणि मानसीला धमकी दिली आहे. यामुळे आता तिघांना आता नव्या गौरीला सामोरे जावे लागणार आहे. गौरीला अशा रुपात पाहून मानली आणि जयदीपचीही घाबरगुंडी उडताना दिसून येणार आहे. आता गौरीने घरात प्रवेश केला आहे.

गौरीने घरात प्रवेश केल्यानंतर गौरीचे वागणे हे माईला आवडलेले नाही. गौरीच्या वागणूकीमुळे माई दुखावल्या गेल्या आहे. पण त्यानंतर गौरी माईंना सगळी परिस्थिती सांगणार आहे. मानसी आणि जयदीपने मिळून कसा आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला होता, हे ती सांगणार आहे.

तिची स्मृती गेली नसून जयदीप आणि मानसीला धडा शिकवण्यासाठी ती हे करताना दिसून येणार आहे. त्यांचा कृत्याचा पर्दाही ती फाश करणार आहे. यामुळे तिला हे सोंग करावे लागत असल्याची कबूली गौरीने माईंसमोर दिली आहे. गौरी हे सत्य सांगण्यासाठी माईंना जंगलात जाऊन भेटते.

गौरीचा पाठलाग करताना शालिनी आणि देवकी देखील जंगलात पोहचतात. यावेळी गौरीला त्यांची चाहूल लागते आणि ती त्यांची नजर चुकवून तिथून निघून जाते. त्यानंतर घरी आल्यावर गौरीवर त्या दोघेही आरोप करताना दिसून येतात. त्यानंतर मात्र गौरी त्यांच्यावर चांगलीच संतापते आणि त्यांना चांगलेच बोल सुनावते.

महत्वाच्या बातम्या-
समंथा ठरली साऊथ इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी दुसरी अभिनेत्री; मानधन ऐकून डोळे पांढरे होतील
IPL 2022: लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्सला केले टाटा-बाय; आता ‘या’ संघाला गोलंदाजी शिकवणार
टाटाची ‘ब्लॅकबर्ड’ कार लवकरच होणार लॉन्च, नेक्सॉनपेक्षाही दमदार, वाचा फिचर्स आणि किंमत

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now