भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरुन देशभरात गदारोळ माजला आहे. देशातील अनेक शहरांमध्ये मुस्लिम समाजाकडून निदर्शने होत आहेत. महाराष्ट्रातील सोलापूर आणि औरंगाबाद शहरात मुस्लिम समाजाकडून जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत. (suhaib kasmi shocking statement on nupur sharma)
अशात जमात उलेमा ए हिंदने घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर देशभरात झालेल्या निदर्शनांशी मुस्लिम विद्वान सहमत नाहीत, असे सुहैब कासमी यांनी म्हटले आहे. शर्मा यांच्या वक्तव्यानंतर आणि शुक्रवारच्या नमाजनंतर देशभरात झालेल्या निदर्शनांवर जमात उलेमा ए हिंदने आज दिल्लीत पत्रकार परिषद बोलावली होती.
जमात उलेमा ए हिंदचे अध्यक्ष सुहैब कासमी यांनी रविवारी नुपूर शर्माबाबत मोठे वक्तव्य केले आहे. प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना इस्लाम धर्मानुसार माफ केले पाहिजे, असे आवाहन सुहैब कासमी यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.
इस्लामच्या नियमानुसार नुपूर शर्माला माफ केले पाहिजे. नुपूर शर्मा आणि तिच्या आक्षेपार्ह विधानाविरोधात शुक्रवारच्या नमाजानंतर देशव्यापी निदर्शने करण्यात आली, त्याला आमचे समर्थन नाही, असे सुहैब कासमी यांनी म्हटले आहे. यावेळी जमात उलेमा ए हिंदने नुपूर शर्मा यांना निलंबित करण्याच्या भाजपच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
तसेच याबाबत जमात उलेमा ए हिंदने फतवा जारी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याद्वारे ते लोकांना नुपूर शर्मा आणि तिच्या वक्तव्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करू नये असे आवाहन करणार आहे. हा फतवा असदुद्दीन ओवेसी आणि मोहम्मद मदनी यांच्याविरोधात असणार असेही कासमी यांनी म्हटले आहे.
यावेळी जमात उलेमा ए हिंदने सरकारला विविध मुस्लिम संघटना आणि त्यांना मिळालेल्या निधीची चौकशी करण्याचे आवाहनही केले आहे केले. तसेच आम्ही इतर मुस्लिम संघटनांना हिंसाचार भडकावू देणार नाही, असेही कासमी यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘अजित पवारांनी पुन्हा फडणवीसांसोबत सरकार स्थापण करावं’; विखे पाटलांची खुली ऑफर
माझी बायको १० वर्षांपासून माझ्यावर रेप करत होती; पतीने केला धक्कादायक खुलासा
‘या’ खेळाडूमुळेच होतोय टिम इंडीयाचा सतत पराभव; खराब कामगिरीने संघावर बनलाय ओझं