Share

पक्षाने निलंबीत करताच सुधीर तांबेंनी दिली पहीली प्रतिक्रीया; काॅंग्रेसलाच खडसावत म्हणाले…

नाशिक मतदार संघात पदवीधर निवडणुकीमुळे राजकीय वातावरणात चांगलीच बोलचाल दिसतेय.
सुधीर तांबे यांना आधी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती. परंतु उमेदवारी जाहीर करूनही त्यांनी अर्ज दाखल केला नव्हता. यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवसाचा मुहूर्त सुधीर तांबे यांनी निवडला आणि अर्ज भरला. सुधीर तांबे हे आपल्या मुलासह सत्यजीत तांबे यांच्यासह सकाळीच घराबाहेर पडले. त्याचवेळी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पक्षाने एबी उमेदवारी अर्ज देऊनही त्यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे पक्षाने सुधीर तांबे यांना निलंबित केले आहे.

पत्रक जारी करत ही कारवाई करण्यात आली आहे. पत्रक जारी करून तास दीड तास उलटत नाही तोवरच सुधीर तांबे यांनी ट्विट करत त्यांच्यावर अन्याय झाला असल्याचे सांगितले आहे. या ट्विट मध्ये परखडपणे भाष्य करत त्यांनी लिहिले आहे की, ‘माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे’.

रविवारी सुधीर तांबे यांच्यावर या निलंबनाच्या कारवाईचे पत्रक जारी करण्यात आले होते. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे यांचे निलंबन करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाने अधिकृतरित्या सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर त्यांनी अर्ज भरण्यास दिरंगाई केली. परंतु त्यांनी शेवटच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेतली.

याचवेळी सुधीर तांबे यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. पिता पुत्राच्या या अनपेक्षित खेळीमुळे काँग्रेस पक्षाने हा निलंबनाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वत्र चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

आता या निलंबनाचा निकाल काँग्रेस पक्ष कधीपर्यंत लावतात, यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे. याचदरम्यान आता सुधीर तांबे हे कोणती खेळी खेळतात हेही महत्वाचे ठरेल. पक्षासंदर्भात तर सुधीर तांबे काही निर्णय घेणार नाही ना? अशीही चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या
तांबेंना धडा शिकवण्यासाठी मविआचे बडे नेते मैदानात; बदला घेण्यासाठी दिला ‘हा’ तोडीस तोड उमेदवार
धोकेबाज सत्यजीत तांबेंना घेरण्यासाठी थेट मातोश्रीवरूनच लागली फिल्डिंग, ‘असा’ आहे गेम प्लान
तो फडणवीसांचाच गेम प्लान! ‘इथून’ हलली सुत्रे, विखेही चेकमेट; वाचा तांबेंच्या बंडाची इनसाईड स्टोरी

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now