Mulukh Maidan
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

तांबेंना धडा शिकवण्यासाठी मविआचे बडे नेते मैदानात; बदला घेण्यासाठी दिला ‘हा’ तोडीस तोड उमेदवार

Pravin Suryavanshi by Pravin Suryavanshi
January 14, 2023
in ताज्या बातम्या, राजकारण
0

काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक मतदार संघातून अ प क्श उमेदवारी अर्ज दाखल केला. या बा त मी ने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म भरता येत असुनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. परंतू नंतर त्यांच्या या खेळीमुळे ही खळबळ उडाली आहे. आता यामुळे निवडणूकीत चांगलीच रंगत येणार आहे. कारण या खेळीमुळे आता निवडणूकीत काँग्रेसचा एकही उमेदवार नसेल.

भाजपचा उमेदवार तर या निवडणूकीत मैदानात उतरलेला नाही. यामुळे आता सत्यजीत तांबे यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे चित्र दिसत होते. परंतू ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नाशिकची मतदारसंघाची ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे सांगितले आहे.

संजय राऊत यांच्या या वक्तव्या नंतर मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावण्यात आली. नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते विजय काळसकर आणि विलास शिंदे हे या बैठकीला उपस्थित आहेत. ही बैठक सुरु असतांनाच नाशिक पदवीधर मतदार संघातील उमेदवार शुभांगी पाटील या देखील उपस्थित झाल्या होत्या. शुभांगी पाटील यांच्या या उपस्थितीमुळे आता ठाकरे गट तसेच संपूर्ण महाविकास आघाडी शुभांगी पाटील यांच्या पाठीशी ताकदीने उभी राहणार असल्याचे दिसत आहे.

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आम्ही सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही, आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊ, असे म्हटले होते. महाविकास आघाडीचे नेते नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांच्यासाठी कार्यक्रम करण्याची जोरदार तयारी सुरु आहे. मातोश्री वर झालेल्या बैठकीत काय घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये झालेल्या जागवाटपाच्या सूत्रात आता बदल होऊ शकतो. यामुळे आता नाशिकमध्ये जागा ठाकरे गट किंवा राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकते. उमेदवार शुभांगी पाटील या मातोश्रीवर असल्यामुळे आता ठाकरे गट कोणती खेळी करते यावर लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीकडून पाठिंबा देण्यात आलेल्या शुभांगी पाटील या सध्या धुळ्यातील भास्कराचार्य संशोधन संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत. शुभांगी पाटील या महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापक आहेत. काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे पाठिंबा काढून घेतल्यास सत्यजीत तांबे आणि भाजप काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल. या सगळ्या हालचाली बघता नाशिकच्या राजकीय वातावरणात खळबळ उडणार आहे हे निश्चित.

महत्वाच्या बातम्या
शिवसेना, धनुष्यबाणाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागला तर ‘हा’ असेल ठाकरे गटाचा प्लान बी
एकनाथ शिंदे हेच खरे शिवसेनाप्रमुख, उद्धव ठाकरेंचे पद बेकायदेशीर; निवडणूक आयोगात हायहोल्टेट ड्रामा
‘माझा घात-अपघात होऊ शकतो’; शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती

Previous Post

sikandar shaikh : वडील हमाली करताना मुलगा पैलवानी करून बनला ‘सिकंदर’, कुस्तीत जिंकल्या २४ बुलेट अन् थार

Next Post

४ गुणांचा वाद, सिकंदरवर अन्याय झाला असं म्हंटलं जातंय, पण नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Next Post
sikandar shaikh

४ गुणांचा वाद, सिकंदरवर अन्याय झाला असं म्हंटलं जातंय, पण नेमकं काय घडलं? जाणून घ्या

ताज्या बातम्या

अमोल कोल्हे अमृता खानविलकर सोबत करणार लग्न! उपमुख्यमंत्रीही होणार? स्वत:च पोस्ट करत म्हणाले…

April 2, 2023

पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला, जागीच मृत्यू; अवघ्या २५ सेकंदात होत्याचं नव्हतं..

April 2, 2023

‘तुम्ही एकदा कोल्हापूरला याच मग…’, संभाजीराजेंनी महंतांना ठणकावले; संयोगिताराजेंबाबत म्हणाले, त्यांनी…

April 2, 2023

आता ऊसाच्या रसावरही लागणार १२ टक्के GST; सरकारचा मोठा निर्णय

April 2, 2023

शेजाऱ्यांच्या घरात मध्यरात्री भयानक आक्रोश, खिडकीतून पाहील्यावर दिसले की पोराने ३८ सेकंदांत ४७ वेळा…

April 1, 2023

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात तुफान राडा! सुरक्षा जवान आणि भक्तांमध्ये जुंपली, भक्तांना बेदम मारहान

April 1, 2023
  • Home
  • Privacy Policy
  • प्रसिद्ध अभिनेत्रीला आला कार्डीअक अरेस्ट, गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल, आता व्हेंटीलेटरवर..

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

WhatsApp Group