राज्यातील सत्तासंघर्ष अखेर संपला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. ते आता राज्याचे मुख्यमंत्री बनले आहे. (sudhir mungantiwar criticize ajit pawar)
आता रविवारी अखेर नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. राहूल नार्वेकर यांनी १६४ मतं मिळवत विजय मिळवला आहे. त्यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व प्रमुख राजकीय नेत्यांनी भाषण देऊन त्यांचे अभिनंदन केले.
तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही भाषण दिले. पण त्यांच्या भाषणात त्यांनी शिंदेंना आणि भाजप नेत्यांना चांगलेच टोले लगावले आहे. त्यामुळे त्यांचे भाषण चर्चेचा विषय ठरले आहे. हे भाषण करताना त्यांनी नव्या अध्यक्ष्यांचे अभिनंदनही केले आहे.
शिंदे साहेब तुम्ही फक्त माझ्या कानात सांगितलं असतं तर मी उद्धव ठाकरेंशी बोलून आधीच तुम्हाला मुख्यमंत्रिपद मिळवून दिलं असतं. कोणालाही काही प्रॉब्लेम झाला नसता, असे म्हणत अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. त्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार बोलायला उभे राहिले, त्यावेळी त्यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे साहेबांनी अजितदादांच्या कानात सांगितले नाही, ती त्यांची चुक होती. पण तुम्हाला भविष्यात असं कधी वाटलं तर आमच्या कानात नक्की सांगा, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांना खुली ऑफर दिली आहे. सध्या या दोन्ही नेत्यांचे भाषण सभागृहात चर्चेचा विषय ठरले आहे.
तसेच आदित्य ठाकरे नवनिर्वाचित अध्यक्षांना गुरुदक्षिणा नक्की देतील. शिवसेनेत अजून काही उरलेत तेही गुरुदक्षिणा म्हणून काही देतील. कारण नार्वेकरांनी आदित्य ठाकरे यांना शिकवलंय, असा टोला मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: मला नको सांगू, तोंड बंद ठेव आणि बॅटिंग कर, भर मैदानात विराट ‘या’ खेळाडूवर संतापला
एकनाथ शिंदे साहेब माझ्या कानात सांगितलं असतं, तर मी…; अजित पवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला
..तेव्हा आमदारांची डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत होत नव्हती, आदित्य ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा