सध्या राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांच्या विरोधात भाष्य करत आहेत. अशातच दीपक केसरकर हा भामटा आणि लबाड माणूस असल्याच शिवसेनेने म्हंटलं आहे.
यामुळे आता आणखीच राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यासह बंडखोर आमदारांवर जहरी टीका केली आहे.
एका मराठी वृत्तवाहिणीशी संवाद साधताना बडगुजर यांनी म्हंटलं आहे की, ‘बंडखोर आमदारांनी शिवसेना खरंच वाचवायची असेल, तर त्यांनी आजही मातोश्रीवर परत जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधावा.’
याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असं व्यक्तव्य केसरकर करत आहेत. केसरकर यांच्या याच वक्तव्याचा समाचार बडगुजर यांनी घेतला आहे.
याबाबत बोलताना बडगुजर यांनी म्हंटलं आहे की, २०१४ साली केसरकर शिवसेनेत आले. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन २०१२ साली झालं आणि केसरकर २०१४ साली शिवसेनेत आले.’
दरम्यान, नारायण राणेच्या धाकाने इकडे आलेला हा माणूस आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरून हा माणूस मला लबाड वाटतो. त्याची नजर सांगते की हा भामटा माणूस आहे” अशा तिखट शब्दात बडगुजर यांनी टीका केली.