उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी मुंबईच्या रणजी संघाची घोषणा करण्यात आली आहे. सरफराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खान याला २१ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. मुशीर खानची (mushir khan) कामगिरी इतकी उत्कृष्ट होती की महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (sachin tendulkar) मुलगा अर्जुन तेंडूलकरला संघात स्थान मिळालेच नाही आणि त्याला घरी बसावे लागले. अर्जुन तेंडुलकरच्या (arjun tendulkar) जागी मुशीर खानला संघात जागा देण्यात आली.
अजिंक्य रहाणे (ajinkya rahane) आणि शिवम दुबे (shivam dube) यांना दुखापतीमुळे संघात स्थान मिळवता आलेले नाही. मुंबईच्या संघाला ६ जूनपासून उत्तराखंडविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळायचा आहे. सलील अंकोला यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मुशीर खानची निवड केली आहे. मुशीर त्याच्या वयोगटातील क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहेत.
अंडर 19 कूचबिहार ट्रॉफीमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडला होता. याशिवाय तो एक उत्कृष्ट लेगब्रेक गोलंदाज देखील आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी झोनल कॅम्पसाठी निवड झाल्यानंतर मुशीर सध्या सुरतमध्ये प्रशिक्षण घेत आहे. त्यांचे वडील नौशाद खान यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले की, मला माझ्या मुलांना भारतीय संघात खेळवायचे आहे.
त्यांनी दोन्ही खेळाडूंवर विश्वास दाखवल्याबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि संघाच्या निवडकर्त्यांचे आभार मानले. नौशाद म्हणाले, सर्वप्रथम, मी मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि संघाच्या निवडकर्त्यांचे आभार मानू इच्छितो. एक मुलगा आधीच संघात असताना त्यांनी ज्या प्रकारे दुसऱ्या मुलावरही विश्वास दाखवला तो खरंच खुप मोठा आहे.
मुशीर आणि सरफराज या दोघांचेही भारतीय संघातून खेळण्याचे स्वप्न आहे. एकेकाळी माझी मुंबई रणजी संघातही निवड झाली होती, पण माझे खेळण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. आता माझी दोन्ही मुलं हे स्वप्न पूर्ण करत आहेत. सरफराज आणि मुशीर यांचे वडील नौशाद खान हे क्रिकेट प्रशिक्षक राहिले आहेत.
ते सांगतात की, त्यावेळी एका क्रिकेटरने त्यांना टोमणा मारला होता. त्यांना ज्या क्रिकेटरने टोमणा मारला होता तो त्यांच्याच कोचिंगमुळे क्रिकेट खेळायला शिकला. त्यानंतरच त्यांनी मुलांना क्रिकेटर बनवायचे ठरवले. नौशाद खान यांनी तो किस्सा शेअर केला. त्यांनी सांगितले, त्या खेळाडूने नौशाद यांना चॅलेंज केले होते.
माझ्याकडे क्षमता होती, म्हणून मी खेळलो. तुमच्याकडेही प्रतिभा असेल तर तुमच्या मुलांना क्रिकेटर बनवून दाखवा आणि संघात त्यांना स्थान मिळवून दाखवा. मग काय, इथून नौशाद यांनी आपल्या मुलांना क्रिकेटर बनवण्याचा निर्णय घेतला. रेल्वे कर्मचारी असलेल्या नौशाद खान यांचे आयुष्य खूप अडचणीतून गेले आहे. ते आधी झोपडपट्टीत राहायचे.
नोकरी व्यतिरिक्त मुलांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ते कपडे विकायचे. त्यांना योग्य सराव मिळावा, मुलं योग्य वेळी क्रिकेटच्या मैदानात पोहोचावीत म्हणून ते स्वत: हजारो किलोमीटर गाडी चालवत असत. नौशाद सांगतात की यासाठी त्यांनी मुंबई ते मेरठ, कधी मुरादाबाद तर कधी आझमगड असा असंख्य वेळा प्रवास केला आहे.
मात्र, या अडचणींनंतरही नौशाद यांनी हिंमत हारली नाही आणि आता आपल्या मुलांना या पदावर आणले आहे. मुंबईला अंडर-19 कूचबिहार ट्रॉफीच्या अंतिम फेरीत नेण्यात मुशीरने मोठे योगदान दिले होते. त्याने स्पर्धेतील 9 सामन्यात 67 च्या सरासरीने 670 धावा केल्या. यामध्ये 2 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.
यासोबतच त्याने 32 विकेट्सही घेतल्या. त्याने मुंबई अंडर 25 संघासाठी 3 सामन्यात एकूण 401 धावा केल्या. यामध्ये मणिपूरविरुद्धच्या २६७ धावांच्या खेळीचा समावेश होता. गतवर्षी डिव्हिजन पोलीस शिल्ड आणि माधव मंत्री एकदिवसीय स्पर्धेतही तो ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ ठरला होता.
मुशीर सध्या स्पोर्ट्स क्लब, मुंबई येथे सराव करतो. अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर आणि पृथ्वी शॉसारखे खेळाडूही तिथे खेळले आहेत. मुशीर हा यंग मोमिडियन क्रिकेट क्लबचा देखील एक भाग होता जिथे त्याला त्याच्या वडिलांनी प्रशिक्षण दिले होते.
त्याचवेळी त्याचा भाऊ सरफराज खान याने गेल्या मोसमात रणजी क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली होती. त्याने संघासाठी अनेक शानदार खेळी खेळल्या. आता मुशीरही आपल्या मोठ्या भावाच्या कामगिरीवर पावलावर पाऊल टाकू शकतो का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
पंचायत २ च्या शेवटच्या एपिसोडमध्ये ‘या’ कारणामुळे घाबरला होता फैसल मलिक, म्हणाला जास्त विश्वास..
२००९ च्या लोकसभा निवडणूकीत छत्रपती संभाजीराजेंचा पराभव का झाला? जाणून घ्या खरी कारणे….
खोतांना डच्चू, मेटेंनाही धाकधूक; विधान परीषदेला भाजप देणार नवीन चेहऱ्यांना संधी; मुंडे, बोंडेंसह ‘ही’ नावं चर्चेत
सलाम! एक पाय गमावूनही मुलीची शिकण्याची जिद्द कायम, एका पायावर लंगडत जाते १ किमी दूर शाळेत