जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो असे म्हणतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 30 मे रोजी नागरी सेवा परीक्षेचा (UPSC) निकाल जाहीर केला आहे. यावेळी अशा अनेक उमेदवारांनी यश संपादन केले, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीत हार मानली नाही आणि कठोर परिश्रमाने यश मिळवले.
आम्ही तुम्हाला अशाच एका टॉपरबद्दल सांगत आहोत ज्याने कठीण प्रसंगांना तोंड देत UPSC परीक्षेत 7 वा क्रमांक मिळवला. मूळचा दिल्लीचा असलेला सम्यक जैन याने 7 वा क्रमांक पटकावला आहे. सम्यांक जैन हा विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाला. त्यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये कॉम्प्युटर सायन्समधून बी.टेकला प्रवेश घेतला.
मात्र याच दरम्यान त्याचा अपघात झाला. त्याची दृष्टी गेली होती. त्याला मॅक्युलर डिजनरेशन झाला होता. त्याची दृष्टी गेल्याने घरच्यांनी त्याला अभ्यास सोडण्यास सांगितले. त्यांनी हार मानली नाही आणि नंतर दिल्ली विद्यापीठातून ओपनमधून इंग्रजी ऑनर्ससह बीए करण्याचा निर्णय घेतला. यात त्यांना यशही मिळाले.
कोरोना संसर्गामुळे मार्च 2020 मध्ये देशभरात लॉकडाऊन लागू झाला तेव्हा त्यांनी UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्याच प्रयत्नात त्याला यश मिळाले नाही. त्याने हार मानली नाही आणि तयारी चालू ठेवली. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 7 वा क्रमांक मिळविला. दृष्टी कमी असल्याने त्यांनी पीडब्ल्यूडी श्रेणीत परीक्षा दिली.
सम्यकचा पेपर लिहीण्यासाठी एका लिहीणाऱ्याची गरज होती. त्यामुळे पदवीपासून ते यूपीएससीपर्यंतच्या प्रत्येक परीक्षेत त्याची आईच त्याचे पेपर लिहीत असायची. त्याच्या आईने UPSC प्रिलिम परीक्षेतही त्याचा पेपर लिहीला होता. तर मुख्य परीक्षेत त्याच्या एका मित्राने त्याचा पेपर लिहीला होता. सम्यक प्रश्नांची उत्तरे द्यायचा आणि त्याची आई आणि मित्र उत्तरपत्रिका लिहायचे.
यूपीएससीमध्ये यश मिळाल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. या प्रवासात त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी साथ दिल्याचे त्याने सांगितले. त्याचे मामा त्याला परीक्षेसाठी घेऊन जायचे. त्याचे वडील एअर इंडियामध्ये करत आहेत. त्यांनाही आपल्या मुलावर खुप अभिमान आहे. पुर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
महत्वाच्या बातम्या
मुसेवालाची हत्या करणारे शुटर आंबेगाव, जुन्नरचे; मुसेवाला प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर
मला मुद्दाम सचिनला चेंडूने जखमी करायचे होते कारण…, शोएब अख्तरने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा करत विवेक अग्निहोत्री यांचा शिवसेनेला टोला, म्हणाले….
सलमानचा खात्मा करण्यासाठी आणली होती ४ लाखांची रायफल, ‘असा’ आखला होता प्लॅन, वाचून हादराल