रेल्वे स्टेशनवरच्या फ्री वायफायने ‘या’ कुलीला बनवले IAS अधिकारी, पियुश गोयल यांनीही केले कौतुक
सक्सेस स्टोरी: कुलीने पास केली UPSC ची परिक्षा, रेल्वे स्टेशनवरचे फ्री वायफाय श्रीनाथसाठी ठरले वरदान
एक म्हण आहे कौन कहता है की, कामयाबी सिर्फ किस्मत तय करती है, अगर दम हो इरादों में तो मंजिलें खुद-ब-खुद झुका करती हैं. एर्नाकुलम स्टेशनवर कुली म्हणून काम करणाऱ्या या तरुणाचे असेच काही प्रबळ इरादे होते, ज्याने घराच्या जबाबदाऱ्यांबरोबरच स्वतःचे नशीबही लिहिले आणि यूपीएससी परीक्षेत यश मिळवले.
काही वर्षांपूर्वीपर्यंत कुली म्हणून काम करणाऱ्या या व्यक्तीने आयएएस अधिकारी बनून पुर्ण देशात एक आदर्श उभा केला आहे. त्याची कहाणी तुम्ही वाचली तर तोंडात बोटे घालाल. अनेकदा तुम्ही लोकांना यश न मिळाल्याबद्दल तक्रार करताना पाहिलं असेल, ज्यामध्ये बहुतेक लोक यश न मिळण्याचं कारण म्हणून सोयी-सुविधांची कमतरता असल्याची कारणं देतात.
जर त्यांना सर्व सुखसोयी मिळाल्या असत्या तर ते आयुष्यात काहीतरी चांगले करू शकले असते, असा त्यांचा विश्वास असतो. पण याबाबत श्रीनाथची कधीच तक्रार नव्हती. आपत्तीचे संधीत रूपांतर करून त्यांनी नवी उंची गाठली. त्यांनी आपल्या यशाच्या मार्गात सोयी सुविधांची कमतरता कधीही येऊ दिली नाही.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दरवर्षी लाखो उमेदवार आपले नशीब आजमावतात. त्यासाठी मोठ्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये लाखो रुपये खर्च करून ते अनेक वर्षे तयारी करतात, मात्र मूळचा केरळचे असलेले श्रीनाथ रेल्वे स्टेशनवर कुली म्हणून काम करतात.
ते केवळ कोचिंगच्या मदतीशिवाय यूपीएससीमध्ये यशस्वी झाले नाहीत तर त्यांनी केरळ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही नाव उंचावले आहे. श्रीनाथ कोचिंग सेंटरची फी भरू शकत नव्हते आणि त्यांच्या मनात एकच गोष्ट होती की कोचिंग सेंटरशिवाय ते ही कठीण परीक्षा पास करू शकणार नाहीत. यामुळेच त्यांनी KPSC तयारी सुरू केली.
रेल्वे स्थानकावर बसवण्यात आलेल्या मोफत वायफायमुळे त्यांचा अवघड मार्ग सुकर झाला. या वाय-फायवरून त्यांनी आपल्या स्मार्ट फोनवर अभ्यास सुरू केला. हे मोफत वायफाय त्यांच्यासाठी वरदानापेक्षा कमी नव्हते. ते इथे कुली म्हणून काम करायचे आणि वेळ मिळताच ऑनलाइन लेक्चर्स ऐकायचे.
आपल्या समर्पण आणि मेहनतीच्या जोरावर श्रीनाथ यांना KPSC मध्ये यश मिळाले. इथून त्यांना विश्वास मिळाला की ते फ्री वाय-फायच्या मदतीने UPSC परीक्षा उत्तीर्ण करू शकतात. आणि त्यांनी ते करून दाखवले. तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी कुली श्रीनाथ यांचे यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेतील यशाबद्दल अभिनंदन करणारे ट्विट केले होते.
गोयल यांनी लिहिले, रेल्वेकडून मोफत वायफायने केरळमध्ये कुली म्हणून काम करणाऱ्या श्रीनाथच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणला आहे, स्टेशनवर उपलब्ध असलेल्या वायफायचा वापर करून त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि यश मिळवले, त्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो. त्याच्या यशासाठी त्याला अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
महत्वाच्या बातम्या
‘या’ कारणासाठी भाजपने अरब राष्ट्रांचे आभार मानले पाहीजेत; अभिनेत्री स्वरा भास्करचा सल्ला
तत्वासाठी सत्तेला लाथ मारणारे बाळासाहेब कुठे अन् राज्यसभेसाठी MIM च्या दाढ्या कुरवळणारे कुठे; मनसेचा शिवसेनेला टोला
२०२१ मध्ये हर्षद पटेलने माझा अपमान केला, रियान परागने हर्षद पटेलसोबतच्या वादावर सोडले मौन
दीपक चाहरच्या रिसेप्शन पार्टीत ‘हा’ खेळाडू ठरला चर्चेचा विषय, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी, म्हणाले..