Share

IPS होऊनही आनंदी नव्हती लेडी ऑफिसर, दुसऱ्यांदा परिक्षा देऊन केला आश्चर्यकारक कारनामा

गेल्या आठवड्यात UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 चा निकाल पुर्ण देशाने पाहिला. निकाल लागल्यापासून जे जे विद्यार्थी यामध्ये पास झाले आहेत त्यांच्या प्रेरणादायी कथा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. अशीच एक कथा आहे बिहारमधील UPSC उमेदवार दिव्या शक्तीची, जिने सलग दुसऱ्यांदा परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

दिव्या शक्ती ही मूळची सारण येथील जलालपूर जिल्ह्यातील आहे. ती डॉक्टरांच्या कुटुंबात जन्मली आणि वाढली. ती नेहमीच गुणवान विद्यार्थिनी होती, तिने मुझफ्फरपूरमधून हायस्कूल पूर्ण केले. इंटरमिजिएट अभ्यासासाठी डीपीएस बोकारो येथे ती गेली होती.

तिने BITS पिलानी येथून संगणक शास्त्रात अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. दिव्याने त्याच कॉलेजमधून अर्थशास्त्रात एमएस्सीही केले आहे. एका अमेरिकन कंपनीत दोन वर्षे काम केले आणि 2019 मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा दिली. दिव्याने तिच्या शेवटच्या प्रयत्नात 79 वा क्रमांक मिळवला आणि 2019 मध्ये तिची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली.

तिची स्वप्ने मोठी होती आणि तिला आयएएस अधिकारी व्हायचे होते. तिने परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि पुन्हा एकदा UPSC 2022 च्या परीक्षेला ती बसली. दिव्या शक्तीने IPS चे प्रशिक्षण घेऊन UPSC च्या परीक्षेची तयारी केली आणि तिने या वर्षी अखिल भारतीय स्तरावर 58 वा क्रमांक मिळवून केलेल्या मेहनतीचे फळ मिळवले.

आपल्या मुलीने UPSC परिक्षा पुन्हा पास केली हे कळताच कुटुंबीयांचा आनंद सातव्या मजल्यावर पोहोचला होता. तिचे वडील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय (GMCH), बेतियाचे माजी अधीक्षक आहेत. ते म्हणाले की, दिव्या ही सुरुवातीपासून अभ्यासू होती. कुटुंबीयांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

इतर UPSC च्या उमेदवारांसाठी ती एक प्रेरणा ठरेल असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या पुर्ण परिसरात तिचीच चर्चा आहे. दुसऱ्यांदा परिक्षा पास करत 58 वा क्रमांक मिळवत तिने सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे. अनेक उमेदवारांना पहिल्यांदा परिक्षा पास करणे अवघड जाते पण दिव्याने सलग दुसऱ्यांदा परिक्षा पास केल्याने सगळेच अवाक झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या
शिवसेनेचा पुन्हा एकदा सामान्य शिवसैनिकावर विश्वास, विधानपरिषदेसाठी संधी दिलेले पाडवी आहेत तरी कोण? जाणून घ्या..
दृष्टी गेली तरी मानली नाही हार, UPSC मध्ये पटकावला ७ वा क्रमांक, आईने आणि मित्राने लिहीला पेपर
मुसेवालाची हत्या करणारे शुटर आंबेगाव, जुन्नरचे; मुसेवाला प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर
‘ती’ गोष्ट ऐकली असती तर आज सिद्धू जिवंत असता; ​​सिद्धू मुसेवालाच्या मित्राने केला मोठा खुलासा

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now