Share

फिल्टरपाडाच्या झोपडपट्टीत राहणारा गौरव मोरे कसा झाला हास्यजत्रेचा स्टार, वाचा यशोगाथा

महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावणारा विनोदवीर गौरव मोरे… हस्याजत्रा या कार्यक्रमाने गौरव मोरेला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्याला नुकताच भीमरत्न पुरस्कार मिळाला त्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत गौरव मोरे त्याच्या आयुष्याबद्दल पहिल्यांदा मोकळेपणाने माध्यमांसमोर बोलला आहे. गौरवने त्यावेळी सांगितले की, मला सुरुवातीपासूनच सिनेसृष्टीचे, रुपेरी पडद्याचे मोठे आकर्षण होते.

गौरव सांगतो की, मला माहित आहे, मी हिरो सारखा दिसत नाही, तसा चेहरा माझा नाही, पण या सिनेमासृष्टीच्या आकर्षणामुळे मी इथे आलो. मला काहीतरी यात करायचं होते, त्यासाठी मी विनोदाचा मार्ग निवडला. खूप प्रयत्नांनंतर मला हास्यजात्रा कार्याक्रमासारख्या मंचावर संधी मिळाली. मला कोणी या ठिकाणी गॉडफादर नव्हता.

गौरवने सुरुवातीच्या काळाबद्दल सांगितले. तो पवई फिल्टरपाडा भागात वाढला. त्या जागेने त्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या, नीतीमूल्य शिकवली. तो जेव्हा ऑडीशनसाठी फिरायचा तेव्हा त्याचाकडे प्रवासाला पैसे नसायचे. मोबाईलची खूप गरज असायची पण तो साधा बटणाचा फोन वापरायचा तो पण त्याने खुप नंतर घेतला होता. शंभर रुपयावर दिवस काढले.

खूप संघर्ष इथपर्यंत पोहचण्यासाठी केला, झोपडपट्टीत वाढलोय. मी कितीही मोठा स्टार झालो तरी मी जिथून आलो त्या जागेला विसरणार नाही, अनेक कलाकार खूप मोठे होतात पण त्यांना ते कुठून आले त्याचा विसर पडतो. मला तसे करायचे नाही, असे गौरव म्हणतो. पवई फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून तो लोकांमध्ये फेमस आहे.

हास्यजत्रैत गौरव त्याच्या विनोदांनी लोकांना खळखळून हसवतो. त्यात त्याच्यासोबत वनिता खरात, समीर चौघुले ,प्रसाद खांडेकर अशी सगळी मंडळी असतात. हस्याजात्रेतून गौरव लोकांच्या घराघरात पोहचला. त्याच्या विनोदाच्या टायमिंगची, मराठी शब्द चुकीच्या पद्धतीने उच्चारुन खुमासदार विनोद करण्याच्या शैलीची दुनिया चाहती आहे.

त्याला मिळालेल्या पुरस्कारानंतर त्याने एक इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली त्यात तो म्हणतो, खरंच मी या पुरस्काराच्या लायक आहे की नाही अजुनही कळत नाहीये. सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकुन देणाऱ्यांसाठी हा पुरस्कार सोहळा आहे. आणि त्यांच्याच बरोबरीने आपल्यासारख्याला पण एवढा मोठा मान आपण दिलात खुप आभारी आहे.

महत्वाच्या बातम्या
मामाची मेहनत ‘अशी’ आली फळाला, UPSC पास करत भाचा झाला मोठा अधिकारी, वाचा यशोगाथा
आपल्या पूर्वजांची माहिती, वंशावळ जपून ठेवणारा ‘भाट’ नेमका आहे तरी कोण? माहिती वाचून आश्चर्य वाटेल
कितीही लपवलं तरी समोर आले होते ‘या’ सेलीब्रिटींच्या लव्ह बाईटचे फोटो, मिडीयामध्ये झाली होती बदनामी
याला म्हणतात प्रेम! प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीसाठी केलं टक्कल, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now