जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून टार्गेट किलिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. काश्मिरी पंडितांना लक्ष्य करुन त्यांच्या हत्या केल्या जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेवरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. (subramnyam swami angry on shaha because of kashmir attacks)
अशात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणावरुन भाजपवरच निशाणा साधला आहे. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. अमित शहा यांना गृह मंत्रालयाऐवजी क्रीडा मंत्रालयात पाठवावे, असे त्यांनी म्हटले आहे. काश्मीरमध्ये रोज काश्मिरी पंडित मारले जात आहेत, आता अमित शहा यांचा राजीनामा घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
स्वामी यांनी ट्विट केले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट आहे आणि तरीही दररोज एका काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली जात आहे. त्यामुळे अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करणे आवश्यक झाले आहे. त्याऐवजी त्यांना क्रीडा मंत्रालय दिले जाऊ शकते कारण आजकाल क्रिकेटमध्ये त्यांना जास्त रस आहे.
दरम्यान, काश्मीरमध्ये गेल्या २० दिवसांत आठ हत्या झाल्या आहेत. ज्यामध्ये काश्मिरी पंडित आणि स्थलांतरित हिंदूंचा समावेश आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात टार्गेट किलिंगच्या माध्यमातून दहशतवाद्यांनी बिगर काश्मिरी आणि काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यांबाबत मोदी सरकार आधीच विरोधकांच्या निशाण्यावर आहे. आता सरकारचेच लोक गृहमंत्री अमित शहा यांना प्रश्न विचारू लागले आहेत.
याआधीही स्वामींनी मोदी सरकारवर अनेकदा टीका केली आहे. भाजप खासदारांनी अफगाणिस्तानपासून चीनपर्यंतच्या मुद्यावरुन मोदी सरकारला घेरले आहे. इतकंच नाही तर स्वामी अर्थमंत्री आणि सरकारवर आर्थिक धोरणांवर टीका करताना दिसत आहेत.
आता विरोधी पक्षांच्या टीकेने घेरलेले अमित शाह काश्मीर प्रकरणावर उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. ज्यामध्ये जम्मू-काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा, एनएसए अजित डोवाल, जम्मू-काश्मीरचे डीजीपी, लष्करप्रमुख यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. या बैठकीत टार्गेट किलिंगवर चर्चा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
शाहरुख खानचा ‘मॉन्स्टर’ लुक आला समोर , बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
‘सत्ताधारी शहरातील कुत्र्यांची नसबंदी करण्यात व्यस्त आहेत’, अजित पवारांचा भाजपला टोला
‘या’ चार बोल्ड वेबसिरीजने घातलाय धुमाकूळ, चुकूनही घरच्यांसोबत पाहू नका, नाहीतर होईल फजिती