शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण लागलं आहे. अनेक बड्या नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. शिंदे यांनी बंड पुकारून अख्ख महाविकास आघाडी सरकार सत्तेतून उतरवलं आहे. यामुळे सध्या शिवसेनेत अस्थिरतेच वातावरण निर्माण झालं आहे.
मात्र काही निष्ठावान नेत्यांनी सत्तानसून देखील उद्धव ठाकरेंचा हात सोडलेला नाहीये. तर दुसरीकडे आता यापूर्वी पक्षाला सोडून गेलेल्यांची घरवापसी देखील सुरू झाली आहे. एका बड्या नेत्यांनी पुन्हा भगवा हाती घेतला आहे. कॉंग्रेस पक्षात असलेले सुभाष वानखेडे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
अलीकडेच शिंदे गटाला हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार संतोष बागंर यांनी पाठिंबा दिल्याने जिल्ह्यात शिवसेनेला धक्का बसला आहे. हीच पोकळी भरण्यासाठी याचबरोबर पाटील, बांगर यांना टक्कर देण्यासाठी सेनेला एका मोठ्या नेत्याची गरज होती.
आता वानखेडे यांच्या घरवापसीमुळे पुन्हा जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होईल असं बोललं जातं आहे. सुभाष वानखडे आणि विनायक भिसे व त्यांच्या समर्थकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. याचबरोबर अनेक कार्यकर्ते देखील लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच बोललं जातं आहे.
दरम्यान, वानखेडे यांनी २०१९ मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची उमेदवारी मिळवली. पण शिवसेनेच्या हेमंत पाटील यांनी त्यांचा दारुण पराभव केला. आता पुन्हा त्यांनी भगवा हाती घेतला आहे. वानखेडे यांचा शिवसेनेला फायदा होणार असल्याच सांगितलं जातं आहे.
एकीकडे शिवसेनेला गळती लागली आहे. तर आता दुसरीकडे पक्षात घरवापसी होऊ लागली आहे. उद्धव ठाकरे व त्यांच्या पुत्र आदित्य ठाकरे हे जोमाने कामाला लागले आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना पुन्हा जोमाने लढणार असल्याच चित्र आता गडद होऊ लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापुरातील दोन्ही खासदार शिंदेगटासोबत, जिल्हाप्रमुख ढसाढसा रडत म्हणाले शिवसैनिक माफ करणार नाहीत
90 च्या दशकात तरुणाईला भुरळ घालणारी RX100 ‘या’ तारखेला पुन्हा येणार बाजारात; यामाहाने केली घोषणा
Rishabh Pant: ‘चले तो चाँद तक नहीं तो शाम तक’, ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरने उडवली पंतची खिल्ली
‘या’ पती-पत्नीला पुर्ण देश करतोय सलाम, कलयुगात अशी मुलं मिळणं कठीण, सुनेनं जिंकलं मन