गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातून महिला अत्याचारांच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. असे असतानाचा आता पुण्यातून एक विचित्रच प्रकार समोर आला आहे. शिक्षणाचे माहेर घर मानल्या जाणाऱ्या पुण्यात एका अल्पवयीन मुलाने असे काही केले आहे, की त्याच्या कारनाम्यामुळे त्याच्या पालकांनाही धक्का बसला आहे. (student shoot teacher video)
एका अल्पवयीन मुलाने घरी शिकवणीसाठी येणाऱ्या शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ तयार केला आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परीसरात एकच खळबळ उडाली असून मुलाच्या या कृत्यामुळे पालकांनाही धक्का बसला आहे.
विद्यार्थ्याची शिकवणी घेण्यासाठी महिला शिक्षक त्याच्या घरी येत होती. त्यावेळी त्याने वॉशरुममध्ये मोबाईल ठेवून शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ बनवला. शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी त्यानेच फोन वॉशरुममध्ये ठेवला होता, याची कबूली त्याने पोलिसांसमोर दिली आहे.
तसेच शिक्षिका विद्यार्थ्याला घरी शिकवत असताना त्याने शिक्षिकेच्या छातीचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला होता, असे शिक्षिकेने फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन पुण्यातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलाविरोधात विनयभंग आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. एका दिग्दर्शकाने एका तरुणीचा अश्लील व्हिडिओ काढून तिच्यावर बलात्कार केला होता. त्या दिग्दर्शकाचे नाव अमित प्रेमचंद सिटलानी असे असून तो विश्रांतवाडीच्या मधूबन सोसायटीमध्ये राहतो.
संबंधित तरुणी ही फिल्म इंडस्ट्रीत बॅकस्टेज आर्टीस्ट म्हणून काम करत होती, दिग्दर्शकाने तिला आपल्या जाळ्यात ओढून तिचा अश्लील व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर त्याने तिला धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या-
…तेव्हा पवारांनी कश्मीर फाईल्सचे कौतूक केले होते; दिग्दर्शकांनी उघड केला पवारांचा ढोंगीपणा
महिलांवर होणारा अन्याय नाही बघवला, दोन मुलांची आई बनली PSI; औरंगाबादच्या रेणूकाची यशोगाथा वाचून व्हाल थक्क
अॅमेझॉन-फ्लिपकार्टपेक्षा ‘या’ वेबसाईटवर स्वस्तात मिळतोय iPhone13; २४ हजारांपर्यंत भरघोस सूट, लगेच करा खरेदी