सरकारी विमानातून प्रवास करणाऱ्या एका दाम्पत्याला एक अविस्मरणीय अनुभव मिळाला आहे. या दाम्पत्याला कसलीही कल्पना नसताना देखील सहप्रवाशांशिवाय विमानात प्रवास करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे खाजगी जेटमध्ये प्रवास करण्याचे स्वप्न या दाम्पत्याचे नकळपणे सत्यात उतरले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ब्रिटिशचे केविन मॅक्युलॉन आणि समांथा जुलै हे दाम्पत्य ग्रीसच्या कॉर्फू बेटावर सुट्टीसाठी गेले होते.
परंतु रिटर्न येताना त्यांनी Jet2 एअरलाइन्सच्या पुढच्या फ्लाइटने येण्याचे ठरविले. त्यानुसार ते शनिवारी संध्याकाळी फ्लाईट पकडण्यासाठी विमानतळावर पोहचले. मात्र यावेळी त्यांना संपूर्ण विमान खाली असल्याचे दिसले. त्यांच्या व्यतिरिक्त विमानात एक ही प्रवासी आलेला नव्हता. त्यामुळे आपणच उशीरा आलोय किंवा फ्लाईट निघून गेल्याचे केविन आणि समांथाला वाटले.
यामुळे त्यांनी विमानाच्या चेक इन काउंटरवर चौकशी करण्याचे ठरविले. इथे आल्यानंतर त्यांना सांगण्यात आले की, आज ते सोडून कोणत्याही प्रवाशांनी फ्लाईटचे टिकीट बुक केलेले नाही. कोरोनामुळे प्रवाश्यांची संख्या देखील कमी झाली आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही सुखरुप प्रवास करु शकता.
हे सर्व ऐकल्यानंतर या दोघांचा प्रचंड आनंद झाला. दोघेही पुन्हा विमानात येऊन बसले. विमानात त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही आलेले नव्हते. त्यामुळे पायलटने त्यांना विमानात फिरण्याची मुभा दिली. तसेच त्यांना जेवन वगैरेही मोफत दिले. यावेळी आपण कुठे पोहचलो, काय चालू आहे, अशी सर्व माहिती आम्ही तुम्हाला देऊ असे पायलटने केविन आणि समांथाला सांगितले.
विमानात कोणीही नसल्यामुळे केविन आणि समांथाला स्पेशल सर्व्हिस देण्यात आली. या दोघांचा हा प्रवास खूपच रंजक ठरला. एकदा तरी खाजगी जेटमध्ये प्रवास करण्याचे स्वप्न या दोघांचे अशा पध्दतीने पुर्ण झाले. या जोडप्याने सांगितले की, आम्हाला विमानात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली. आम्हाला फक्त मास्क घालणे बंधणकारक केले. परंतु इतर सर्व सुविधा व्हीआयपी सारख्या मिळाल्या.
महत्वाच्या बातम्या
एका व्यक्तीवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा.., काश्मीर फाईल्सवर आमिर खानने सोडले मौन
‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ घेते ‘पवार सरकार”, शिवसेना खासदाराचा घरचा आहेर
“मी एका रात्रीचे ५ हजार घेतो, श्रीमंत महिला माझ्याकडे…” मेल सेक्स वर्करचा मोठा खुलासा
एमआयएमच्या प्रस्तावावर खुद्द शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, कोणी कोणत्या पक्षात जायचं हे..