भारत देशात विविध धर्माचे लोक राहतात आणि विविध परंपरा पाळल्या जातात. विविध धर्माचे लोक असल्यामुळे भारतात अनेक सण साजरे केले जातात. हिंदू धर्मातही अनेक सण साजरे केले जातात. या सगळ्या सणांमध्ये हळदी कुंकूला खुप महत्वाचे स्थान आहे. कोणतीही पुजा असली तर सगळ्यात आधी हळदी कुंकू वाहिले जाते. पण काही देव असे आहेत त्यांना फक्त हळद वाहिली जाते.
यामागे अनेक कारणे आहेत. जेव्हा हळद आणि कुंकू एकत्र उधळले जाते तेव्हा त्याला भंडारा म्हणतात. भंडारा कधी आणि केव्हा उधळला जातो हे तर सर्वांनाच माहिती आहे. भंडाऱ्यालाही हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. विशेषत: महाराष्ट्रामध्ये अनेक गावांमध्ये भंडारा उधळला जातो.
पिढ्यानपिढ्या अनेक देवतांच्या पालख्यांमध्ये भंडारा उधळला जातो. अनेक गावांमध्ये जेव्हा या देवांच्या पालख्या निघतात तेव्हा खुप भंडारा उधळतात. त्या भंडाऱ्याचा एक सुगंध असतो तो हवेत पसरला की वातावरण मंगलमय होतं. बाळूमामांचा जेव्हा उत्सव होतो तेव्हाही मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्याची उधळण केली जाते.
जे खंडोबाचे भक्त आहेत त्यांना माहिती असेल की खंडोबाची जीजी देवस्थाने आहेत तिथेही भंडाऱ्याची उधळण केली जाते. ढोल, ताशे वाजवतात त्यांच्या तालावर लोकं नाचतात. सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. जो कोणी खंडोबाच्या मंदिरात जातो तेथे पुजारी भाविकांच्या कपाळाला भंडारा लावतात.
लोकंही मोठ्या श्रद्धेने हा भंडारा कपाळाला लावून घेतात. जेजुरीचा खंडोबा हे लाखो भाविकांचे अराध्य दैवत आहे. पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर असलेला जेजुरी गड सर्वांना माहिती आहे. लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. या जेजुरीत भंडारा उत्सव वर्षातून तीन वेळा साजरा केला जातो.
या भंडारा उत्सवात संपुर्ण गडावर मोठ्या प्रमाणावर भंडारा उधळला जातो. पुर्ण गड पिवळ्या रंगाच्या छायेत झाकून जातो. या कारणामुळे या गडाला सोन्याची जेजुरी असं म्हणतात. हा भंडारा उधळतात श्रद्धाळू येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा देतात.
खंडोबाला मल्हार असेही म्हणतात कारण खंडोबाने मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर खंडोबाला मल्लारी असे नाव पडले. तीनवेळा भंडारा उत्सव होतो त्यातील एक दिवस म्हणजे सोमवती अमावस्या. यावेळी खंडोबाची पालखी निघते आणि त्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक दरवर्षी येत असतात.
या पालखीला खांदा देण्याचा मान फक्त रामोशी धनगर समाजाला आहे. खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे असं मानलं जातं. हा नवसाला पावणारा देव आहे. त्याच्या दोन पत्नी होत्या. म्हाळसा आणि बाणाई. या दोन्ही पत्नी पार्वती आणि गंगेचे रुप आहेत असं मानलं जातं. शंकराचा अवतार असल्यामुळे खंडोबाला बेलाची पाने आवडतात.
खंडोबाची चार भुजाधारी मुर्ती आहे. त्याच्या एका हातात भंडारा पात्र आहे आणि दुसऱ्या हातात खंडा तलवार आहे. बाकी दोन हातात डमरू आणि त्रिशुळ आहे. आता अनेकांना हा प्रश्न पडला असेल की खंडोबाला भंडाराच का प्रिय आहे? त्यामागे एक कथा आहे. एकदा रात्रीने शंकराकडे आपल्या काळ्या रंगाबाबत नाराजी व्यक्त केली होती.
तसेच अशी मागणीही केली होती की शंकराने तिचा स्वीकार करावा. तेव्हा शंकराने तिला वरदान दिले होते की, जेव्हा मी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन जन्म घेईन तेव्हा मी तुला मस्तकी धारण करेन. त्या वरदानाने रात्रीने हळदीच्या रुपात पृथ्वीवर जन्म घेतला आणि शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला.
त्यानंतर खंडोबाने मल्ल आणि मणीचा संहार केला आणि भंडारा आपल्या मस्तकी लावला. सर्व देवतांनी यावेळी भंडारा उधळून आनंद व्यक्त केला आणि तेव्हापासून जेजूरी येथे भंडारा उधळला जातो. तेव्हापासून भंडारा म्हणजे हळद जेजुरी गडावर मोठ्या प्रमाणावर उधळली जाते. आता तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल.
महत्वाच्या बातम्या
संजय राऊत थोडक्यात वाचले नाहीतर संजय पवार निवडून आले असते’, छगन भुजबळ स्पष्टच बोलले
भाजपचा फार मोठा विजय नाही, ही कपटी खेळी भविष्यात तुमच्या.., अमोल मिटकरींचा भाजपवर हल्लाबोल
“… त्याच्या बुडावर लाथ मारून हाकालपट्टी केली आहे”, संजय राऊतांवर राजू शेट्टी भडकले
आमचे देवेंद्रजी आहेतच तसे! महाडिक जिंकताच चंद्रकांत पाटलांनी फडणवीसांचं केलं तोंडभरून कौतुक