bahulicha haud | १८९९ मध्ये पुण्यात एका चिमुकलीची हत्या झाली होती. तिची हत्या फक्त यासाठी झाली होती की ती शाळेत जात होती. त्या मुलीचे नाव काशिबाई होते. काशिबाई ही सत्यशोधक चळवळीचे पहिले अध्यक्ष डॉ. विश्राम रामजी घोले यांची कन्या होती. डॉ. विश्राम घोले मोठे शल्यविशारद होते. त्यांचे पुण्यात खुप नाव होते.
ते माळी समाजातील मोठे प्रस्थ, पुणे नगरपालिकेचे सदस्य आणि नंतर स्थायी समितीचे अध्यक्ष राहून गेले होते. बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे की, महात्मा फुलेंशी त्यांचे खुप जवळचे संबंध होते. ते महात्मा फुलेंचे सहकारी आणि फॅमिली डॉक्टर होते. सर्वात महत्वाचे म्हणजे ते एक थोर समाजसुधारक होते.
महात्मा फुले यांचा आदर्श घेऊन त्यांनी स्त्रीशिक्षणाचं काम आपल्या खांद्यावर घेतलं होतं. याची सुरूवात त्यांनी आपल्या घरापासून करायचं ठरवलं. त्यांनी आपली लाडकी बाहुली हिला शिकवण्यास सुरूवात केली. तिचं नाव काशिबाई होतं पण तिला लाडाने सगळे बाहुली म्हणायचे.
डॉ. घोले हे स्त्रीशिक्षणाचे कट्टर समर्थक होते. त्यांचा आग्रह होता की आपल्या मुलीने शाळेत शिकावे म्हणून त्यांनी बाहुलीला शाळेत घातले. बाहुली अभ्यासात खुप हुशार होती. बाहुलीला तिच्या वडिलांचा पाठिंबा होता पण समाजातील काही लोकांना ही गोष्ट पचली नाही.
त्यांनी या गोष्टीला विरोध करण्यास सुरूवात केली. अनेक बड्या लोकांनी डॉ. घोले यांना समजावण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांनी ऐकलं नाही तेव्हा त्यांना धमक्या देण्यात आल्या. त्यांना वाळीत टाकण्यात येईल अशा धमक्या येऊ लागल्या. डॉ. घोले यांनी कोणत्याही धमकीला भिक घातली नाही.
त्यांनी आपल्या लाडक्या बाहुलीचे शिक्षण सुरूच ठेवले. पण एकदा असं काही घडलं की डॉ. घोले यांना जबर धक्का बसला. स्त्रीशिक्षणाला विरोध असणाऱ्या काही व्यक्तींनी बाहुलीला काचा कुटून घातलेला लाडू खायला दिला. भोळ्या चिमुकल्या बाहुलीनेही तो लाडू आवडीने खाल्ला पण तो लाडू खाल्ल्याने तिला अंतर्गत रक्तस्त्राव झाला अन् तिचा दुखद मृत्यु झाला.
आपल्या लाडक्या बाहुलीच्या मृत्युने डॉ. घोले यांना खुप दुख झाले. त्यानंतर त्यांनी बाहुलीच्या स्मर्थनार्थ बाहुलीचा हौद बांधला. हा हौद त्यांनी सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुला केला. १०० वर्षांपेक्षा जास्त काळ हा हौद बुधवार पेठेतील कोतवाल चावडीजवळ होता आणि अनेक लोकांनी त्याचा लाभ घेतला.
त्यानंतर रस्तारुंदीकरणासाठी कोतवाल चावडी १९९५ साली जमिनदोस्त करण्यात आली. त्यावेळी फरासखाण्यासमोरून हा हौद हलवण्यात आला. सध्या या हौदावर काशिबाईंच्या आठवणी कोरून ठेवण्यात आल्या आहेत. संगमरवरातील परशी हौदावर लावण्यात आली आहे. त्यावर काशिबाईंचा हौद असं लिहीण्यात आलं आहे. केवळ स्त्रीशिक्षणासाठी बलिदान दिलेल्या या बाहुलीची शेवटची आठवण तरूण पिढीला पाहायला मिळणे अवघड आहे.
महत्वाच्या बातम्या
उद्धवसाहेबांनी सर्वधर्मीयांचे प्राण वाचवले, तुम्ही तर थाळ्या वाजवायला आणि दिले लावायला सांगितले
हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक! मुस्लीम कुटुंबाच्या घरात आरतीसोबतच नमाज पठणही; वाचा सविस्तर
…पण इतका निर्लज्जपणा कोणीच दाखवला नाही; आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले
Lalbaugcha Raja : ८ तास रांगेत उभं राहून आत्महत्या केलेल्या मुलीच्या आईचे लालबागच्या राजाला भावनिक पत्र ; वाचून तुमच्याही डोळ्यात अश्रू येईल