पुणेकरांनो! स्वारगेट हे नाव कसं पडलं माहिती आहे का? जाणून घ्या यामागची भन्नाट स्टोरी

खुप कमी लोकांना माहिती आहे की पुण्याचे (pune) जुने नाव हे पुनवडी (punwadi) ऊर्फ पुर्वणी होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (chatrapati shivaji maharaj) आधीच्या काळापासून लोकांना पुणे शहर माहिती होते. एवढंच काय पुणे हे भारतातील सातवे सर्वात मोठे शहर आहे हे ही बऱ्याच पुणेकरांना माहिती नसेल.

आज आम्ही पुण्याबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला कदाचित माहिती नसेल. पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. तसेच शहरात असलेल्या शिक्षण पद्धतीमुळे पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते.

पुणे हे उद्योग क्षेत्रात आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही खुप प्रगती करत आहे. तसेच पुण्यात पर्यटनासाठीही अनेक स्थळे आहेत जसं की, महादजी शिंद्यांची छत्री, चतृश्रुंगी मंदिर, विश्रामबाग वाडा, शनिवारवाडा, तुळशीबाग, लाल महाल इ. दगडुशेठ गणपती पुण्याची शान आहे.

तसेच पुण्यात गेट हे नावसुद्धा खुप प्रसिद्ध आहे. त्यापैकीच एक आहे स्वारगेट (swargate). पण आधी स्वारगेटला मुहियाबाद असे नाव होते. स्वारगेटच्या नावामागे खुप मोठा इतिहास आहे जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पुण्यातील स्वारगेट आणि जुन्या काळातील मुहियाबाद हे महाराजांच्या काळात नदीच्या किनारी पुनवडी नावाचे एक गाव होते.

नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कसबा पेठजवळ लाल महाल बांधला आणि पुनवडी येथे लोकांची वर्दळ वाढू लागली. त्याचवेळी दुसरीकडे स्वराज्यावर आक्रमणे होऊ लागली होती. यावर तोडगा काढण्यासाठी महाराजांनी संरक्षण म्हणून गावात येणाऱ्या चौक्या किंवा नाक्यावरचे ठिकाण म्हणून कोतवाल असे त्याचे नाव ठेवले.

त्यानंतर या ठिकानांना वेगळी ओळख मिळाली. त्या ठिकाणांची इंग्रजांच्या काळातही तेवढीच ख्याती होती. इंग्रजांच्या काळात कोतवाली बंद करून तिथे पोलीस खाते तयार करण्यात आले होते. नाके किंवा चौकी यांच्या नावात नंतर बदल करण्यात आला आणि त्यांना गेट असे नाव देण्यात आले.

येथील पोलिसांना आणि कर्मचाऱ्यांना घोडे देण्यात आले होते. देखरेख ठेवण्यासाठी हे कर्मचारी आणि पोलिस दिवसरात्र तिथे पहारा देत असत. येथे घोडेस्वार तैनात केले गेले होते त्यामुळे या ठिकाणाचे नाव नंतर स्वारगेट म्हणून उदयास आले. नंतर त्याला स्वारगेट म्हणूनच लोक ओळखू लागले.

या नाक्यावरून रस्ता कात्रजमार्गे साताऱ्याला जात असे. या नाक्याचा उपयोग तपासणीसाठी, जकात वसूल करण्यासाठी केला जात होता. आजही पुण्यात स्वारगेट सोडलं तर, पुलगेट, रामोशीगेट, म्हसोबा गेट, मरीआई गेट, फडगेट, पेरू गेट, जाईचे गेट, क्वार्टर गेट, कोंढवा गेट इ. नावं देण्यात आली आहेत.

यापैकी रामोशीगेट या ठिकामी रामोशी या समाजातील लोकांची पहारेकरी म्हणून नेमणूक केली जात होती त्यामुळे त्याला रामोशीगेट असे नाव पडले. तसेच स्वारांचा पहारा त्यामुळे नंतर स्वारगेट असे नाव पडले होते. आता तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील.

महत्वाच्या बातम्या
मशीद कोणीही घेऊ शकत नाही कुर्बानी देण्यासाठी तयार, मुस्लीम खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
फक्त पेट्रोल डिझेल नाही तर महागाईमध्ये मोदी सरकारने या ५ गोष्टीही केल्यात स्वस्त, घ्या जाणून..
भयानक! कॉलेजमधून २०० फुटांवर ओढत नेले, नंतर चाकु भोकसून केला खुन; हत्येच्या कारणाने पोलिस हादरले
शॉर्ट्स घालते म्हणून सुनवायचे लोकं, तीच बनली वर्ल्ड चॅम्पियन, वडिलांनी सांगितली संघर्षाची कहाणी