प्रसिद्ध सेलिब्रिटी आपल्या व्यवसायासोबत दुसरा व्यवसायही करताना दिसून येतात. काही सेलिब्रिटी पैशांची गुंतवणूक करतात, तर काही सेलिब्रिटी नवीन कंपनी सुरु करतात. पण सध्या एक टीव्ही स्टार चांगलीच चर्चेत आली आहे. ती चक्क आपला घाम विकून पैसे कमवत आहे. ( stephanie matto selling sweat)
स्टेफनी मॅटो असे या टीव्ही स्टारचे नाव आहे. ती आधीही चर्चेत आली होती. आधी ती पोटातील गॅस विकून पैसे कमवत होती, त्यामुळे ती आजारी पडली होती. तर आता तिने स्वत:चा घाम विकण्यास सुरुवात केली आहे. या घामातून ती लाखोंची कमाई करत आहे.
३१ वर्षांच्या स्टेफनीच्या घामाच्या एका बाटलीची किंमत ४० हजार रुपये इतके आहे. या घामातून ती दिवसाला चार लाखांची कमाई करत आहे. स्टेफनी ही अमेरिकेतील कनेक्टिकट येथील रहिवासी असून ती एक टीव्ही अभिनेत्री आहे. ती नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते.
तिने सूर्यप्रकाशात स्विमिंग पूलजवळ वेळ घालवला तर १५ मिनिटांत घामाने बरणी भरून जाते. जर जास्त घाम आला तर १० बाटल्या घामाने भरल्या जातात. ती सुमारे ४० हजार रुपयांना एक बाटली विकते. ती दावा करतो की तो दररोज ४ लाख घाम गाळून कमवते.
स्टेफनी म्हणाली की, मला स्विमिंग पूलजवळ बसायला आवडते, पण त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, त्याला कधीच हलक्यात घेऊ नका. घाम विकत घेणाऱ्यांबद्दल टीव्ही स्टार म्हणाली की, माझ्या घामाचा वास घेऊन माझे चाहते स्वतःला माझ्या जवळचे समजू शकतात.
स्टेफनी म्हणते की, घाम गोळा करण्याच्या प्रक्रियेत ती स्वतःला खूप हायड्रेट ठेवते, ज्यामुळे जास्त घाम येतो. दिवसभर उन्हात बसणे धोकादायक ठरू शकते याची जाणीव रिअॅलिटी स्टारला आहे, त्यामुळे ती स्वत:चे रक्षण करण्यासाठी खबरदारीही घेते.
महत्वाच्या बातम्या-
माफियांनी ७ वेळा केला हल्ला, एक डोळाही गमावला; जिद्दीने युपीएससी क्रँक करत मिळवले यश
१५ हजार रुपयांची गुंतवणूक करुन व्हा करोडपती, ‘हा’ भन्नाट फॉर्म्युला तुम्हाला माहितीये का?
IPL नंतर SA मिशनची तयारी सुरू, वाचा कोठे आणि कधी-कधी होणार T20 चे सामने?