Share

आंबेडकरांसाठी मी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार, पण…; चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

chandrakant patil

Chandrakant Patil: भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आज १ जानेवारीला भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) येथे हजारो लोक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात. पण चंद्रकांत पाटील या कार्यक्रमात उपस्थित नव्हते.

सुरुवातीपासूनच वर्ष भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे. यावरून बरेच मतभेद होतात. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे ते अडचणीत सापडले. त्यानंतर पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेक करण्यात आली होती.

त्यानंतर चंद्रकांत पाटील हे सार्वजनिक ठिकाणी फेसशिल्ड घालून वावरताना दिसत आहेत. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी चंद्रकांत पाटील कोरेगाव-भीमा फेसशिल्ड घालूनच जातील, असा अंदाज वर्तविला जात होते. पण पुन्हा शाईफेक होण्याच्या शक्यतेमुळे त्यांनी कोरेगाव-भीमा येथे जाणे टाळले आहे.

या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी लिहीले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे. परंतु, हजारो, लाखो अनुयायी दरवर्षी भिमा कोरेगांवला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्यांमध्ये, अशा एखाद्या घटनेमुळे गालबोट लागावे, जातीय दंगे व्हावे, अशी काही जणांची सुप्त इच्छा आहे.

तसेच, सर्वांनी शांततेने शौर्याचे प्रतिक असलेल्या विजयस्तंभास मानवंदना करावी आणि दर्शन घ्यावे. त्याचवेळी कोणतेही जाती वाद निर्माण होऊ नये, म्हणून चंद्रकांत पाटील यांनी आव्हान देखील केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घराघरात साजरी व्हावी व नव्या पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचावेत म्हणून प्रत्यक्ष प्रयत्न केले, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

यादरम्यान, चंद्रकांत पाटील हे भीमा कोरोगावला न जाता त्यांनी घरातच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले आहे. तसेच, समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मनसुबा मी पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा देखिल चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-
भारतातील ‘हे’ गाव आहे आशियातील सर्वात श्रीमंत गाव; वर्षभर एकच फळ विकतात अन् थेट करोडपती बनतात
एकनाथ शिंदे – उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार; शिंदे गटातील मंत्र्याने केला मोठा गौप्यस्फोट
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच ‘या’ अभिनेत्रीवर होत जिवापाड प्रेम पण…

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now