राज्यात सध्या मशिदींच्या भोंग्यांवरुन वाद सुरु आहे. बुधवारी ४ तारखेला जिथे जिथे भोंग्यांवर अजान सुरु होईल, तिथे तिथे लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावा असे आवाहन राज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. (state government order to action sandeep deshpande)
राज ठाकरे यांनी पोस्ट करुन सर्व मनसैनिकांना हनुमान चालिसेबाबत आवाहन केले आहे. त्यामुळे बुधवारपासून राज्याचे वातावरण तापलेले आहे. बुधवारी अनेक ठिकाणी पहाटे भोंग्यांविना अजान झाल्या. तर जिथे भोंगे लावून अजान झाल्या तिथे मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावली होती.
बुधवारी अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना पोलिस ताब्यात घेत होते. मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेत असताना एक महिला पोलिस कर्मचारी जखमी झाल्या आहेत. आता या प्रकरणाची दखल गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आहे.
शंभूराज देसाई यांनी ट्विट करत संदीप देशपांडेंवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना शंभूराज देसाई यांनी हे आदेश दिले आहे. आता मनसेच्या बड्या नेत्यावर कारवाई होणार असल्यामुळे राज्यात आणखी तणाव निर्माण होऊ शकतो.
मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे शिवतीर्थाबाहेर पत्रकारांशी बोलत होते. इतक्यात पोलिस त्यांना ताब्यात घेण्यासाठी आले. संदीप देशपांडे पोलिसांशी बोलत असताना त्यांच्या गाडीपाशी गेले, त्यानंतर पोलिसांना लोटत गाडी सुरु करुन ते पळून गेले होते.
तसेच संदीप देशपांडेसोबत असणारे संतोष धुरी देखील तिथून पसार झाले. या सगळ्या झटापटीत एक महिला कर्मचारी खाली पडल्या होत्या. या झटापटीत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सर्वप्रकार घडल्यानंतर आता शंभूराज देसाई यांनी ट्विट केले आहे. मनसेचे नेते श्री. संदिप देशपांडे यांनी आज मुंबई पोलीस दलातील महिला अधिकारी यांचेशी केलेल्या गैरवर्तनाबद्दलची माहिती मी घेतली असून सदरच्या घडलेल्या गंभीर प्रकाराबद्दल तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त श्री. संजय पांडे यांना दिले आहेत, असे ट्विट शंभूराज देसाई यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘राज ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब बनण्याचा प्रयत्न सुरु आहे’, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका
Apple कंपनीला ‘हा’ छोटासा निर्णय पडला महागात; जॉब सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची लागली रांग
सकाळी निसटलेले रात्री प्रकट झाले! संदीप देशपांडेंनी घडलेल्या प्रकाराबद्दल स्पष्टच सांगितलं, म्हणाले..