Share

नोकरी सोडा अन् 25 हजारात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, महिन्याला 3 लाखांपर्यंत होईल कमाई; सरकार देतंय 50% अनुदान

सध्या बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध नाहीयेत, त्यामुळे तरुण-तरुणी शेती किंवा स्वत:चा व्यवसाय करण्याचा विचार करताना दिसून येतात. पण अनेक लोकांमध्ये हा गैरसमज आहे, की व्यवसाय सुरु करण्यासाठी जास्त पैसे लागतात.

आज आम्ही तुम्हाला असा व्यावसाय सांगणार आहोत, जे फक्त २५ हजार रुपयांमध्ये तुम्ही सुरु करु शकतात. तसेच या व्यवसायातून दरमहिन्याला ३ लाख रुपयांपर्यंत कमाई करु शकतात. सोबतच या व्यवसायात तुम्हाला सरकारकडून ५० टक्के सबसिडी पण भेटू शकते. हा व्यवसाय म्हणजे मोत्यांच्या शेतीचा.

सध्या मोतीच्या शेतीचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कमी पैशांमध्ये जबरदस्त नफा मिळत असल्याने अनेक तरुण-तरुणी या व्यवसायाकडे वळत आहे. चला तर मग जाणून व्यवसाय सुरु करण्यासाठी काय करावे लागते.

मोत्यांची शेती करण्यासाठी एक तलाव, असे शिंपले ज्यांमध्ये मोती तयार होऊ शकतात आणि प्रशिक्षण या तीन गोष्टींची आवश्यकता असते. तलाव तुम्ही स्वत: तयार करु शकतात. यासाठी सरकार ५० टक्के सबसीडीही देते.

सीप भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सापडतात. पण दक्षिण भारत आणि बिहारमधील दरभंगा येथील शिंपल्यांचा दर्जा चांगला असतो. तसेच या शेतीची ट्रेनिंग तर अनेक संस्थांमध्ये दिली जाते, पण तुम्ही मध्य प्रदेशातील होशंगाबाद आणि मुंबईतु असणाऱ्या संस्थेतून घेऊ शकतात.

शिंपल्यांनी एका जाळ्यात बांधून १० ते १५ दिवस तलावात ठेवतात. तलावात काही दिवस शिंपले ठेवल्यानंतर त्यांना बाहेर काढून त्यांच्यावर पुन्हा प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया करत असताना शिंपल्यामध्ये एक साचा टाकला जातो. त्यानंतर शिंपले साच्यानुसार कोटींग तयार करुन मोती तयार करत असतात.

एक शिंपला तयार होण्यासाठी साधारणपणे २५ ते ३५ रुपये खर्च येतो. तर शिंपला तयार झाल्यावर त्यामधून दोन मोती मिळत असतात. एक मोती जवळपास १२० रुपयांना विकला जातो, जर मोतीचा दर्जा चांगला असेल, तर त्याची किंमत २०० रुपयांपेक्षा जास्त असते.

एक एकराच्या तलावात तुम्ही जर २५ हजार शिंपले टाकले तर तुम्हाला ८ लाख रुपये खर्च करावे लागतील. यातून ५० टक्केपेक्षा जास्त शिंपले सुरक्षित बाहेर येतात. त्यामुळे या व्यवसायातून तुम्ही वर्षाला ३० लाख रुपयांची कमाई करु शकतात.

महत्वाच्या बातम्या
परिक्षा द्यायला गेलेल्या मुलाला घरी येताच बसला जबर धक्का, आई-वडील सापडले मृत अवस्थेत
शिवसेनेला मोठा धक्का! आयकर विभागाच्या रडारवर ‘हा’ बडा नेता, IT विभागाने घरी मारली धाड
‘या’ अभिनेत्रीच्या हाती लागला अक्षय कुमार आणि इमरान हाशमीचा १०० कोटी बजेटवाला चित्रपट
भोंदूबाबाचा आईसह तीन मुलींवर बलात्कार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन करायचा अत्याचार…

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now