गेल्या पाच महिन्यांपासून एसटी महामंडळाचे कर्मचारी विलीणीकरणाची मागणी करत होते. पण अखेर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर परतावे लागले आहे. यावेळी काही कर्मचारी आपल्या लालपरीला पाहून भावूक झाल्याचे दिसून आले आहे. (st workers crying after seeing bus)
न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत सांगलीमध्ये ३०० कर्मचारी पुन्हा आपल्या कामावर परतले आहे. यावेळी एक महिला कर्मचारी लालपरीला पाहून खुपच भावूक झाली आहे. त्या प्रसंगाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओही भावूक करणारा आहे.
मंगळवारी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत कामावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी एसटी डेपोत जाऊन त्यांनी लालपरीचे स्टेअरींग सांभाळले आहे. अनेक कर्मचारी गेल्या पाच महिन्यांपासून लालपरीपासून दूर होते. त्यामुळे ते कर्मचारी लालपरीला पाहून गहिवरुन गेले होते.
सांगलीत 300 एसटी कामगार कामावर रुजू झाले असून त्यावेळी लालपरीला पाहून अनेक महिला कर्मचाऱ्यांना रडू कोसळले #म #मराठी pic.twitter.com/FkU8RwNlZc
— Tumchi Gosht (@TumchiGosht) April 20, 2022
अनेक महिला कर्माचाऱ्यांनी जेव्हा लालपरीला बघितले तेव्हा त्यांना रडू कोसळले. त्या महिला कर्मचारी खूपच भावूक झाल्याच्या दिसून आल्या. त्यातल्या एका महिलेने लालपरीचे चुंबन घेत तिला मिठी मारली आहे. या घटनेमुळे एसटी डेपोचे वातावरणही गहिवरुन गेलेले होते.
यावेळी हजर राहिलेल्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहून सेवा करण्याची ग्वाही दिली. याचबरोबर त्यांनी आम्ही सर्वजण गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत आहोत. सदावर्तेंना आमचा पुर्णपणे पाठिंबा आहे, असेही तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर परतण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर कर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत कामावर परतू लागले आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील ७३६ कर्मचारी कामावर हजर झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील फेऱ्याही वाढत चालल्या आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुंबई पोलीस इन ऍक्शन मोड! ‘या’ वेळेत भोंगे वाजवण्यास बंदी, नियम मोडल्यास होणार कारवाई
“दंगली थांबवायच्या असतील तर सर्वात आधी भाजपच्या मुख्यालयावर बुलडोझर चालवा”
चीनच्या रस्त्यावर बंद पिशवीत आढळत आहेत जिवंत कुत्रे आणि मांजर; काय आहे चीनचा नेमका प्लान वाचा