बिग ब्रेकींग! अखेर एसटी संपावर तोडगा निघाला; उद्या विधीमंडळात होणार मोठी घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरु आहे. पण गेल्या चार महिन्यांपासून सुरु असलेला एसटी संप अखेर मागे घेण्यात येणार असण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळसंदर्भात परीवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत संपावर तोडगा काढण्यात आल्याचे म्हटले जात आहे. (st strike end tomorrow)

अनिल परब यांच्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून संप मिटण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी १० वाजता विधानपरीषद सभापती सभागृहात माहिती देणार आहे. त्यामुळे आता चार महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी संपावर तोगडा निघाला असून संप संपणार असल्याचे म्हटले जात आहे.

विधानसभेचे सभापती रामराज निंबाळकर यांच्या निर्देशानुसार, आमदारांची समिती स्थापन करण्यात आली होती. समिती स्थापन करुन त्यांना आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्याच्या सूचना काल सभापतींनी दिल्या होत्या.

आता १० मार्चच्या अल्टिमेटम अगोदर एसटी संदर्भात महत्वाची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली आहे. परीवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीला गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, शेकापचे जयंत पाटील, प्रवीण दरेकर, शेखर चन्ने बैठकीला उपस्थित होते.

एसटी कर्मचाऱ्यांचे विलिणीकरणाच्या मागणीसाठी अजूनही आंदोलन सुरु आहे. मात्र यासाठी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला आहे. तोच अहवाल विधानसभेत पटलावर ठेवण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलिणीकरण शक्य नाही, असे त्या अहवालात म्हटलेले होते. त्यामुळे पगारवाढीच्या निर्णयानंतर आपली मागणी लावून ठेवत कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवलं आहे.

२८ ऑक्टोबरला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु झाला होता. राज्याची जीवनहानी असणाऱ्या एसटीची वाहतूक गेल्या १०० दिवसांपासून जास्त काळासाठी बंद होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. या संपामुळे एसटी महामंडळाचे तब्बल १६०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-
वाईडसह क्रिकेटच्या ‘या’ नियमांमध्ये झाले मोठे बदल; झेलबाद झाला तरी फलंदाज..
काश्मिरी पंडीतांवरील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या काश्मिर फाईल्स सिनेमाच्या प्रमोशनास कपिल शर्माचा नकार
आता महाविकास आघाडीही झाली आक्रमक; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यांना पोलीसांनी केली अटक