दक्षिण भारतीय चित्रपटांसोबतच संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या दिग्दर्शकांच्या यादीत एसएस राजामौली यांचे नाव सामील झालेले आहे. एसएस राजामौली यांनी चित्रपटसृष्टीत २१ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत १२ चित्रपट केले. असे असले तरी त्यांचे जवळपास सर्वच चित्रपट यशस्वी झाले आहेत. (SS Rajamauli total property)
एसएस राजामौली यांचे शेवटचे दोन चित्रपट ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे आणि सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट ठरले. बाहुबली आजही लोकांच्या हृदयावर आणि मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्याचवेळी राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
एसएस राजामौली यांचे सिनेमे बिग बजेट असतात. उत्तम व्हिज्युअल, अप्रतिम चित्रीकरणामुळे आज राजामौली यांचा समावेश मोठ्या निर्माता दिग्दर्शकांच्या यादीत आहे. पण त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांच्या चित्रपटात काम करणारे अभिनेते सुपरस्टार होतात, पण एसएस राजामौली स्वतः किती कमावतात, हे आपण आज जाणून घेणार आहोत.
निर्माता दिग्दर्शक एसएस राजामौली हैदराबादमध्ये राहतात. हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये राजामौली यांचा आलिशान बंगला आहे. २००८ मध्ये त्यांनी हे घर विकत घेतले होते. याशिवाय राजामौली यांच्या देशभरात अनेक स्थावर मालमत्ता आहेत.
दिग्दर्शक एसएस राजामौली यांची आयुष्य जगण्याची पद्धतही खुप लक्झरी आहे. त्यांच्याकडे जगातील सर्वात महागड्या ब्रँडच्या कार आहेत. राजामौली यांच्या कार कलेक्शनमध्ये रेंज रोव्हर आणि बीएमडब्ल्यूचा समावेश आहे, ज्यांची किंमत १ कोटी ते १.५ कोटी रुपयांपर्यंत आहे.
राजामौली यांच्या कमाईत गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजामौली दरवर्षी १३ कोटी रुपये कमावत होते, परंतु २०२२ मध्ये राजामौली यांनी सुमारे २४ कोटी कमावले आहे. ते इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा दिग्दर्शक-निर्माते आहे.
राजामौली यांच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट स्टुडंट नंबर १ होता, जो ज्युनियर एनटीआरच्या कारकिर्दीतील यशस्वी चित्रपट होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत १२ चित्रपट केले ज्यात साई, छत्रपती, मगधीरा, मेरीदा रमन्ना, बाहुबली १ आणि बाहुबली २ यांचा समावेश आहे.
जर आपण आरआरआर आणि बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो, तर ते सुमारे २० दशलक्ष डॉलर्सचे मालक आहेत. भारतीय चलनात राजामौली यांची एकूण संपत्ती १४८ कोटी रुपये आहे. ते चित्रपट, खाजगी गुंतवणूक आणि त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमधून कमाई करतात.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल सुरू होण्याआधीच राडा! ‘या’ संघात अंतर्गत वाद भडकला; कर्णधारानेच केली…
रिषभ पंतकडे भारताचा कर्णधार होण्याची क्षमता; संघाला दोनदा विश्वकप जिंकून देणाऱ्या कॅप्टनचं मोठं विधान
पोस्टमार्टम करताना महिलेच्या अंतर्वस्त्रात डॉक्टरांना असं काही आढळलं, ज्याने सर्व प्रकरणाचा झाला खुलासा