Share

‘धर्मवीर’ची साक्षात बाॅलीवूडचे मॅजिक मॅन राजामौलींनाही पडली भूरळ; तरडेंची भेट घेत म्हणाले…

प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या बाहुबली या चित्रपटाने भारतीय सिनेमाच्या इतिहासात आशय, विषय, तंत्र अशा सगळ्याच बाबतीत अनेक विक्रम तयार केले आहे. (ss rajamauli meet pravin tarade)

बाहुबलीच्या दोन्ही चित्रपटांची फक्त भारतातच नाही, तर जगभरात चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी RRR सिनेमा काढला. या सिनेमानेही अनेक रेकॉर्ड केले आहे. अशा प्रसिद्ध दिग्दर्शकाने आता मराठी चित्रपट सृष्टीचे दिग्दर्शक प्रविण तरडे यांची भेट घेतली आहे.

प्रविण तरडे यांचा धर्मवीर मु. पो. ठाणे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने राजामौली आणि प्रविण तरडे यांची भेट झाली आहे. प्रविण तरडे, चित्रपट निर्माते मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांची राजामौली यांच्याशी हैदराबाद येथे भेट झाली. यावेळी राजामौली यांनी धर्मवीर चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहे.

राजामौली यांच्या भेटीनंतर प्रविण तरडे भारावून गेले आहे. या भेटीवर बोलताना ते म्हणाले की, राजामौली सरांना मी कायमच माझा आदर्श मानत आलो आहे. त्यांनी दक्षिणात्य चित्रपट ज्या भव्यदिव्यतेने जगभरात पोहचवला, तसंच काहीतरी आपल्याला मराठी चित्रपटाबाबत करता यावं, ही माझी इच्छा आहे.

राजामौली सरांना भेटण्याची खुप इच्छा होती. धर्मवीरच्या निमित्ताने ती इच्छा पुर्ण झाली आहे. त्यांनी आमच्याशी संवाद साधला. काही अनुभव, किस्से आमच्याशी शेअर केले. त्यांच्या या भेटीतून आपला मराठी सिनेमा जगाचा एक सिनेमा बनवण्यासाठीची एक नवी उर्जा आणि प्रेरणा आम्हाला मिळाली आहे, असे प्रविण तरडे यांनी म्हटले आहे.

या भेटीवर निर्माते मंगेश देसाई यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा बाहुबली चित्रपट बघितला होता, तेव्हा कधीच विचार केला नव्हता की बाहुबलीच्या जन्मदात्याला भेटण्याची संधी मिळेल. पण आज तो योग जुळून आला. त्यांना भेटण्यापूर्वी मनात थोडी धाकधूक होती, थोडं दडपण होतं. पण नंतर जेव्हा ते आमच्याशी भेटले, बोलले, तेव्हा ते दडपण नाहीसं झालं, असे मंगेश देसाई यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
गेल्या पंधरा वर्षात भोंग्याचा त्रास झाला नाही, नेमका भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्रास का झाला?
“IPS कृष्णप्रकाश यांच्यासाठी 200 कोटींची वसुली?”, लेटर बॉम्बने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
‘आई..लवकर घरी परत येईन’ असं सांगून गेलेल्या वैष्णवीचा मृतदेहच आला घरी; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now