Share

३ रुपयांच्या शेअरच्या किंमतीत जबरदस्त वाढ, गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे झाले ६ कोटी; मिळाला बंपर परतावा

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते शेअर्समध्ये गुंतवणूक करणे म्हणजे एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासारखे आहे. आजकाल, मोठ्या संख्येने गुंतवणूकदार स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करत आहेत. बाजारात असे अनेक शेअर आहेत जे त्यांच्या गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीत बंपर परतावा देण्यास सक्षम आहेत. जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करू शकता. (SRF stock market return)

आजकाल अनेक मल्टीबॅगर पेनी स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना तगडा परतावा दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की पेनी स्टॉक हे असे स्टॉक आहेत जे खूप स्वस्त आहेत आणि ज्यांचे बाजार मूल्य कमी आहे. SRF शेअर्सची किंमत हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.

हा २०२१ मधील मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे, या स्टॉकने त्याच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या २० वर्षात, SRF शेअरची किंमत ३.७१ वरून आज २४२४.५० रुपयांपर्यंत पर्यंत पोहचली आहे. या कालावधीत शेअर्समध्ये सुमारे ६५,२५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या एका महिन्यात, SRF शेअरची किंमत सुमारे २३४९ वरून २४२४.५० पर्यंत वाढली आहे, या कालावधीत शेअरमध्ये सुमारे ३.५ टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या ६ महिन्यांत, SRF चे शेअर्स सुमारे १८१२ वरून २४२४.५० पर्यंत वाढले आहेत, जे या काळात शेअरची किंमत सुमारे ३५ टक्के वाढली आहे.

हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या एका वर्षात सुमारे १०९० वरून २४२४.५० पर्यंत वाढला आहे, या वेळी शेअरच्या किंमतीत सुमारे १२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये हा मल्टीबॅगर केमिकल स्टॉक ३१५ वरुन २४२४.५० रुपयांना भिडला आहे. गेल्या दशकात, SRF शेअरची किंमत ५४ रुपयांवरुन २४२४.५० पर्यंत वाढली आहे, या कालावधीत शेअर्समध्ये सुमारे ४३५० टक्के वाढ नोंदवली आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे १ लाख रुपये आज १.०३ लाख झाले असते, तर गेल्या ६ महिन्यांत ते १.३५ लाख झाले असते. गुंतवणुकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये वर्षभरापूर्वी १ लाख गुंतवले असते, तर आज त्याचे १ लाख २.२५ लाख झाले असते.

तसेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने ५ वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये १ लाख गुंतवले असते, तर आज त्याचे १ लाख रुपये ७.७५ लाख झाले असते. पण जर एखाद्या गुंतवणूकदाराने २० वर्षांपूर्वी या पेनी स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे १ लाख रुपये ६.५३ कोटी झाले असते.

महत्वाच्या बातम्या-
गंगुबाई काठियावाडी ठरली फ्लॉप, तर साऊथच्या ‘या’ चित्रपटांनी केली तिप्पट कमाई; कमाई वाचून तोंडात बोटं घालाल
आज करोडोची मालकीन असणाऱ्या कंगनाकडे एकेकाळी कपडे घ्यायलाही पैसे नव्हते
महेश भट्ट यांनी मुलगी पुजाबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ लज्जास्पद इच्छा, लिपलाॅक किस देखील केला होता

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now