Share

एका महिन्यात २ लाख लोकांनी घेतली ‘ही’ जबरदस्त बाईक, किंमत फक्त ६५ हजार अन् मायलेज ८० किलोमीटर

देशात दिवसेंदिवस पेट्रोलच्या किंमतीत प्रचंड वाढ होत आहे. ही वाढ सामान्य माणसाला परवडणारी नाही. त्यामुळे अनेकजण पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे वैतागले आहे. याला पर्याय म्हणून लोक जास्त मायलेज देणारी वाहने किंवा इलेक्ट्रॉनिक वाहनांना पर्याय म्हणून बघत आहे. (splender plus 2 lakh units sale)

अशात जी वाहने जास्त मायलेज देत आहे, त्यांची विक्री वाढली आहे. हिरो कंपनीला याचा मोठा फायदा झाला आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच ३० दिवसांत हिरोच्या एका मोटारसायकलचे २ लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. हिरो स्प्लेंडर प्लस असे या मोटरसायकलचे नाव आहे.

हिरो स्प्लेंडर प्लस ही देशातील तसेच कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाईक बनली आहे. ही बाईक तिची किंमत, मायलेज आणि मजबूत स्टाइलमुळे पसंत केली जात आहे. या बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही बाईक ८० किमी प्रतिलीटर मायलेज देते. हे मायलेज एआरआयने प्रमाणित केले आहे.

वाहन कंपन्यांच्या जानेवारी महिन्यातील वाहनांच्या विक्रीच्या आकडेवारी आता समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२२ मध्ये हिरो स्प्लेंडरला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. तसेच या बाईकची सर्वाधिक खरेदी करण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार, हिरोने जानेवारी २०२२ मध्ये या बाईकच्या २,०८,२६३ युनिट्सची विक्री केली होती. तर कंपनीने जानेवारी २०२१ मध्ये या बाईकच्या २,२५,३८२ युनिट्सची विक्री केली होती. जानेवारी २०२२ ची विक्री जानेवारी २०२१ पेक्षा कमी असतानाही, ती इतर बाईक्सच्या तुलनेत खूप पुढे आहे.

हिरो स्प्लेंडरमध्ये कंपनीने सिंगल सिलेंडर ९७.२ सीसी इंजिन दिले आहे, जे फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानावर आधारित आहे. या इंजिनच्या मदतीने ८.०२ पीएस पॉवर आणि ८.०५ एनएमचा पीक टॉर्क मिळवता येतो. ही बाईक चार व्हेरिएंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. हिरो स्प्लेंडरची सुरुवातीची किंमत ६५,५१० रुपये (एक्स-शोरूम) आहे, या बाईकचा टॉप मॉडेल ७०,७९० रुपयांपर्यंत जाते.

महत्वाच्या बातम्या-
प्राजक्ता गायकवाडने जेजुरी गडावर घेतले खंडेरायाचे दर्शन; नंतर म्हणाली, भूलोक, पाताळलोक, स्वर्गलोक….
गुजरात टायटन्सला मोठा धक्का; ज्याच्यासाठी करोडो खर्च केले त्या स्टार खेळाडूनेच घेतली माघार
‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट पाहिल्यानंतर बॉयफ्रेंड रणबीरची काय प्रतिक्रिया होती? आलिया भट्ट म्हणाली..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now