गेल्या काही वर्षांत प्लास्टिक सर्जरीचा कल खूप वाढला आहे. सुंदर आणि परिपूर्ण दिसण्याच्या स्पर्धेत, महिला स्वत:वर शस्त्रक्रिया करण्यासाठीही तयार होतात. पण यामध्ये मृत्यूचा धोकाही असतो. याचे अनेक धक्कादायक प्रकरणेही समोर येत असतात. (actress chetana raj pass away at the age 21)
आता एक प्रसिद्ध अभिनेत्रीला याच कारणामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कन्नड अभिनेत्री चेतना राजही अशाच सर्जरीची बळी ठरली आहे. प्लास्टिक सर्जरी करताना झालेल्या चुकीमुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.
सोमवारी कन्नड अभिनेत्री चेतना राजला फॅट फ्री शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्रीला काही बरे वाटत नव्हते. सायंकाळपर्यंत तिची प्रकृती ढासळू लागली आणि त्यांच्या फुफ्फुसात पाणी भरू लागले.
कन्नड टीव्ही अभिनेत्रीला हे दुःख फार काळ सहन करता आले नाही आणि वयाच्या २१ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की, चेतना राजने तिच्या आई-वडिलांना शस्त्रक्रियेची माहिती दिली नाही आणि ती तिच्या मित्रांसह हॉस्पिटलमध्ये गेली.
आता चेतनाचे पालक डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत. डॉक्टरांच्या चुकीमुळेच मुलीचा अकाली मृत्यू झाल्याचे अभिनेत्रीच्या पालकांचे म्हणणे आहे. चेतनाच्या कुटुंबीयांनी हॉस्पिटल कमिटीविरुद्ध जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
चेतना राज ही कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. ‘गीता’ आणि ‘दोरेसानी’ या प्रसिद्ध मालिकांमध्ये तिने चांगले काम केले. चेतनाने अचानक हे जग सोडल्याने तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. चेतनाच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच दु:ख झाले असून, शस्त्रक्रियेद्वारे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत एका तरुण अभिनेत्रीला आपला जीव गमवावा लागला हेही दुःखद आहे.
महत्वाच्या बातम्या-
राज्यसभेसाठी भाजपने तिसरी जागा लढवण्याची केली खेळी; संभाजीराजेंची वाट आता भाजपनेच
नागपूरमध्ये पोलिसांनी केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, म्होरक्याचे नाव ऐकून पोलिसही हादरले
एमएस धोनीच्या शुटींगदरम्यान सुशांतकडे एक बुकलेट होती ज्यामध्ये.., कियाराने सांगितला किस्सा