सध्या नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि राहूल यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. असे असतानाच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (sonia gandhi admitted in hospital)
सोनिया गांधी यांना नुकताच कोरोना झाला होता. अशातच त्यांची आता अचानक प्रकृती बिघडली आहे. काँग्रेसने सोनिया गांधींच्या प्रकृतीचे अपडेट दिले आहे. यामध्ये काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, १२ जून रोजी सोनिया गांधींच्या नाकातून रक्त येत होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सध्या सोनिया रुग्णालयातच आहेत. काँग्रेसच्या वतीने सरचिटणीस जयराम रमेश यांनीही सोनिया गांधींच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. जयराम रमेश यांनी सांगितले की, सोनियांना कोरोना झाला होता. त्यानंतर १२ जून रोजी त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागले, त्यानंतर त्यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जयराम यांच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधींवर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू झाले. असे सांगण्यात आले की, गुरुवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, नंतर त्यांच्या श्वसनमार्गामध्ये बुरशीजन्य संसर्ग झाल्याचे आढळून आले. सोनिया गांधींवर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) चौकशी सध्या सुरू आहे. राहुल गांधींसोबत सोनियांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. पण कोविडमुळे त्या सहभागी होऊ शकल्या नाही. सध्या ईडीने सोनियांना २३ जूनला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आता सोमवारी चौकशी होणार आहे. राहुल गांधींच्या आवाहनावरून एजन्सीने चौकशी तीन दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. गुरुवारच्या सुटीनंतर राहुल गांधी शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात पोहोचणार होते, परंतु सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने ईडीने चौकशी करण्याची तारीख बदलली आहे.
महत्वाच्या बातम्या-
नुपूर शर्मांची जीभ कापणाऱ्याला एक कोटी देण्याची केली घोषणा, भीम आर्मीच्या प्रमुखाला अटक
‘या’ देशावर आलीये वाईट वेळ; उष्ट्या, शिळ्या, बुरशी लागलेल्या भाकरी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड
सुनील गावसकरांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, आधी मला सचिन तेंडूलकर आणि आता उमरान मलिक..