Share

सोनालीचा संस्कारी बहु’वाला अंदाज! सासरी बनवली खीर, उखाणाही घेतला, मंगळसुत्राच्या उलट्या वाट्या…

सोनाली कुलकर्णी सध्या तिच्याच नवऱ्यासोबत दुसरं लग्न करून दुसऱ्यांदा हनिमूनला जाऊन आली आहे. मेक्सिकोला हनिमूनला गेल्यावर तिने तिकडचे टाकलेले फोटो भलतेच गाजले होते. कोरोना काळात सोनालीने कुणाल बेनोडेकर सोबत साधेपणाने लग्न केले होते. त्यामुळे आता तिने पुन्हा कुणालसोबत दुबईत थाटामाठात लग्नगाठ बांधली आहे.

त्यानंतर जोडपं मेक्सिकोत हनिमूनला गेलं होत. तिचे हॉट अवतारातील अनेक फोटो पाहून चाहतेही थक्क झाले होते. हनिमून ऍन्जॉय करून आल्यावर ती सध्या तिच्या सासरी आहे. कुणालचे म्हणजे तिच्या नवऱ्याचे घर लंडनमध्ये आहे. त्या ठिकाणी तिच्या नव्या कुटुंबियांमध्ये ती मस्त रमली आहे.

तिचा वेगळाच अंदाज समोर आला आहे. तिचे सासरचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. सासरी ती घरच्यांची सेवा करताना दिसत आहे. या बाबत एक पोस्ट इंस्टाग्रामवर तिने टाकली आहे. सोनालीने पहिल्यांदा सासरी स्वयंपाक बनवला आहे. याचा फोटो शेअर करत सोनालीने एक मस्त कॅप्शन दिले.

‘सासरी केलेला पहिला पदार्थ, तांदळाची खीर’. तिने हा फोटो शेअर करताच कमेंट्सचा आणि लाईक्सचा पाऊस पडला आहे. लग्नानंतर गोड पदार्थ बनवून खायला घालत तिने सासरच्या मंडळीना खुश केले आहे. तिने त्यावेळी पारंपारिक वेगळा लुक केला होता.

कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, कुर्ती घातलेला तिचा हा पारंपारिक अंदाज सगळ्यांना आवडला आहे. सोनालीचा हा अवतार बघून तिचे चाहते खुश झाले आहेत. सोनालीने मराठी प्रथेनुसार खास उखाण्यातून नवऱ्याचे नाव पण घेतले. सोनाली म्हणते, लग्नविधीनंतर घातलेल्या मंगळसुत्राच्या उलट्या वाट्या.. कुणालच्या घराच्यांसाठी आणल्या तांदळाच्या खिरीने भरलेल्या वाट्या.’

तिचा हा भन्नाट उखाणा वाचून चाहत्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेहमी मॉडर्न कपड्यात फिरणाऱ्या स्टायलिश सोनालीला संस्कारी, सौज्वळ सुनबाईच्या रुपात बघून सर्व चाहते तिच्यावर सोशल मिडीयावरून कौतुकाचा वर्षाव करत आहेत. लाखो चाहत्यांनी तिच्या या फोटोला लाईक केले आहे.

https://www.facebook.com/photo.php?fbid=581435866673078&set=a.264255661724435&type=3

महत्वाच्या बातम्या
लखनऊच्या पराभवामुळे केएल राहुलवर प्रचंड भडकला गौतम गंभीर; दोघांमध्ये मैदानावरच जुंपली..
महाराष्ट्रात प्राचीन तलावाच्या खोदकामात सापडले पंचमुखी शिवलिंग; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
‘राज ठाकरेंचा बापही अयोध्येत येऊ शकणार नाही’; आव्हान देताना ब्रिजभूषणची जीभ घसरली
“संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवले पाहिजे, त्यांना मान खाली घालायला लावू नये”; राजेंसाठी पंकजा मुंडे मैदानात

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now