गेल्या काही महिन्यांपासून सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. मात्र मीडियावर याबाबत बोलणे ते टाळत होते. पण आता झहीरने जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबूली दिली आहे. तसेच सोनाक्षी सिन्हाने सुद्धा याला दुजोरा दिला आहे. (sonakshi and zaheer confirm their relationship)
झहीर इक्बालने सोनाक्षी सिन्हासोबत प्रेमाचे नाते असल्याचे स्पष्ट केले आहे. झहीरने एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टवर त्याने आय लव्ह यू असे म्हटले आहे. तर त्यावर सोनाक्षीनेही ‘लव्ह यू’ असे उत्तर दिले आहे. सध्या त्यांची ही कमेंट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या या पोस्टवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत आणि ते त्यांचे अभिनंदन करत आहेत. झहीर इक्बालने सोनाक्षीसोबत घालवलेल्या सुंदर क्षणांचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा… मला न मारल्याबद्दल धन्यवाद. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. येणाऱ्या काळात आपण फक्त खात राहू,
झहीर इक्बालने शेअर केलेली ही पोस्ट सोनाक्षीने पाहताच ती स्वत:ला रोखू शकली नाही. तिने उत्तरात लिहिले, ‘थँक्यू.. मीही तुझ्यावर प्रेम करते, पण आता मी तुला मारायला येत आहे. या पोस्टवर पत्रलेखा, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण शर्मा, तारा सुतारिया आणि हुमा कुरेशी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल नुकतेच एका लग्नात एकत्र दिसले होते. दोघेही ब्लॅक कलरचा ड्रेस घालून आले होते. सोनाक्षी आणि झहीर इक्बाल दीर्घकाळापासून एकमेकांसोबत आहेत. काही आठवड्यांपूर्वी, जेव्हा सोनाक्षीने हिऱ्याच्या अंगठीचे काही फोटो शेअर केले होते, तेव्हा तिने झहीर इक्बालशी इंगेजमेंट केल्याची चर्चा रंगली होती.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल डबल एक्सएल या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात हुमा कुरेशी देखील आहे. झहीरने सलमान खानच्या ‘द नोटबुक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
महत्वाच्या बातम्या-
‘नुपूर पैगंबरांबाबत सत्यच बोलली, तिला सपोर्ट करा, अरबांना शरण जाऊ नका’ डच खासदाराचा भारतीयांना सल्ला
नुपूर शर्मा पैगंबरांबाबत सत्य तेच बोलली, अरब देशांना शरण जाऊ नका; डच खासदाराचा भारतीयांना सल्ला
पांढरे केस, आधाराला काठी; एकेकाळी देशाचे राजकारण गाजवणारे सुरेश कलमाडी आता काय करतात?






